Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPakNewsUpdate : भारताचे ‘ब्राह्मोस’ मिसाईल पाकिस्तानच्या हद्दीत जेंव्हा फायर होते तेंव्हा …. !!

Spread the love

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन संघर्षातील बातम्या कानावर अदालत असतानाच पाकिस्तानच्या सीमा भागात भारतीय सुपरसोनिक मिसाईल फायर झाले असून केवळ भारतीय सैन्याच्या सरावादरम्यान चुकून हा प्रकार घडल्याचे भारतने म्हटले आहे. दिनांक ९ मार्च रोजी हे मिसाईल डागण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानच्यावतीने करण्यात आला होता. भारतीय हद्दीतून पाकिस्तानच्या हद्दीत तब्बल १२४ किमीपर्यंत हे मिसाईल आल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. दरम्यान भारताने ही गोष्ट अपघाताने घडली असल्याचे मान्य करीत खेद व्यक्त केला आहे.


या प्रकरणात संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून भारत सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतल्याचं त्यामध्ये सांगण्यात आले आहे. हे मिसाईल पाकिस्तानच्या सीमेमध्ये पडल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. नियमित देखरेख करताना तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचे संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. पाकिस्तानवर चुकून डागण्यात आलेले हे मिसाईल ब्रम्होस असल्याचे सांगण्यात येत आहे. हे मिसाईल हरियाणातील सिरसा एअर बेसवरून फायर झाले होते. बुधवारी पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भारतावर गंभीर आरोप केले होते. शुक्रवारी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. या घटनेवरून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मंहम्मद कुरेशी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले.

पाकिस्तानच्या मियॉं चन्नू या ठिकाणी हे मिसाईल पडल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणापासून बहावलपूरमध्ये १६० किमी अंतरावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरचे घर आहे. बुधवारी पाकिस्तानमध्ये हे मिसाईल पडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मोरक्या मसूद अझहर हा २०१९ साली झालेल्या पुलवामा घटनेचा मास्टरमाईड होता. पुलवामा घटनेनंतर भारतीय सेनेने जैशच्या बालाकोट या ठिकाणाचा दहशतवादी अड्डा नष्ट केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!