Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Budget 2022 LIVE : सामाजिक न्याय विभागाला २ हजार ८७६ कोटी रुपये : अर्थमंत्री अजित पवार

Spread the love

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


Live |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद – LIVE


Maharashtra Budget 2022 LIVE : आजचा अर्थसंकल्प म्हणजे, विकासाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल, अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

राज्याच्या आरोग्यासाठी अशा आहेत तरतुदी

राज्यात या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ३ हजार १८३ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे.

जालना येथे ३६५ खाटांचे मनोरुग्णालय. ग्रामीण भागातील जनतेसाठी शिवआरोग्य योजना . प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय पातळीवर याचा विस्तार करण्यात येणार

पुणे शहराजवळ इंद्रायणी मेडिसीटी उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करण्यात येणार 2061 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार

देशातील होतकरु युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षण मिळावं म्हणून प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार

Maharashtra Budget 2022 LIVE : मुंबई, पुणे, नागपूरमध्ये स्वातंत्र्यलढा हेरिटेज वॉक सुरु करणार : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पातून मोठी घोषणा, मोबाईल मिळणार, बालसंगोपनासाठीच्या निधीत अडीज हजार रुपयांची मोठी वाढ ​​​​​​​ : अर्थमंत्री

Maharashtra Budget 2022 LIVE : महाबळेश्वर, अजिंठा, वेरुळचा सर्वांगिण विकास करणार, सुविधा केंद्र सुरु करणार, अजित पवारांची घोषणा

Maharashtra Budget 2022 LIVE : पुण्यातील फुलेवाड्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी

Maharashtra Budget 2022 LIVE : गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव, शिर्डी विमानतळासाठी १५००  कोटींचा निधी, रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटींची निधी, अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2022 LIVE : महिला आणि बालविकास विभागाला २ हजार ४७२ कोटी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : सामाजिक न्याय विभागाला २ हजार ८७६ कोटी रुपये : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE :  क्रीडा विभागासाठी ३५४ कोटींचा निधी

Maharashtra Budget 2022 LIVE : पुणे शहरात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध करुन देणार

Maharashtra Budget 2022 LIVE : महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील व्हॅट १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के केला.

Maharashtra Budget 2022 LIVE : ४० वर्षांवरील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी. या सरावासाठी सरकार २५० कोटी रुपये खर्च करणार आहे.

Maharashtra Budget 2022 LIVE : महाराष्ट्र भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार आहे.

Maharashtra Budget 2022 LIVE : महिलांवरील गुन्हे कमी करण्यासाठी साताऱ्याचा महिला सुरक्षा मॉडेल प्रकल्प राज्यभर राबविण्यात येणार

Maharashtra Budget 2022 LIVE : मुंबईतील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन २ एप्रिलला (गुढीपाडव्याच्या दिवशी)

Maharashtra Budget 2022 LIVE :  सारथी पुण्याला योजनांच्या अंमलबजावणीसाठी २५० कोटी रुपये मिळणार

Maharashtra Budget 2022 LIVE : पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष रुग्णालये उभारण्यात येणार आहेत

Maharashtra Budget 2022 LIVE : संरक्षित स्मारकांच्या देखभालीसाठी सरकार निधीचे खाजगी स्रोत विकसित करणार आहे

Maharashtra Budget 2022 LIVE : कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यातील दुसऱ्या टप्प्यातील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी २५ रुपयांची तरतूद

Maharashtra Budget 2022 LIVE :  रायगड किल्ल्यासाठी सरकारने 100 कोटी रुपयांची तरतूद

Maharashtra Budget 2022 LIVE : रस्ते आणि महामार्गाच्या बांधकामासाठी PWD विभागाला १५,७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Budget 2022 LIVE : आदिवासी विकास विभागासाठी ११,११९ कोटींचा निधी

Maharashtra Budget 2022 LIVE : प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : पुणे शहरात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध करुन देणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : प्रत्येक जिल्ह्यात टेलीमेडिसीन रुग्णालय उभारणार, ३ हजार १८३ कोटींचा निधी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगडमधील खानापूर जमीन देणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : ८ कोटी रुपयांची ८ मोबाईल कर्करोग निदान वाहने पुरवणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : आरोग्य क्षेत्रासाठी ११ हजार कोटी रुपयांचा निधी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : १५ लाख ८७ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस दिला : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला १० कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी ३ फिरत्या पशुशाळा उभारणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : यंदाच्या वर्षात ६० हजार कृषी पंपांना वीज देणार, १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्यामचे लक्ष्य : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : जलसंपदा विभागाला १३ हजार  २५२ कोटींची तरतूद : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ, अन्न प्रक्रिया योजना राबवणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी निधी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार ऐवजी आता ७५ हजार रुपयांचं अनुदान : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेतून ११ प्रकल्प पूर्ण करणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : येत्या २ वर्षांत १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी : अर्थमंत्री अजित पवार

Maharashtra Budget 2022 LIVE : संभाजीराजे महाराजांचे स्मारक हवेलीमध्ये उभारणार, २५० कोटीची तरतूद

Maharashtra Budget 2022 LIVE : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांकडून विधिमंडळात अर्थसंकल्प सादर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!