Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या “त्या ” पेन ड्राईव्हवरील प्रतिक्रिया अशा आहेत…

Spread the love

मुंबई , अहमदनगर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करीत त्याच्या पुराव्यादाखल तब्बल सव्वाशे तासांचे ऑडिओ आणि व्हिडीओ फुटेज असणारा ‘पेन ड्राईव्ह’ सादर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर प्रकाश आंबेडकरांचे म्हणणे असे कि, कोणत्याही इलेक्ट्रिक डिव्हाईसमध्ये फेरफार होऊ शकतो, त्यामुळे त्याचा योग्य तपास झाल्यानंतरच बोलता येईल तर शरद पवारांनी असे म्हटले आहे कि , आरोपांची राज्य सरकारने चौकशी करावी. माझे अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं. पण माझा काही संबंध नाही. रेकॉर्डिंगच्या सत्यतेबाबत पडताळणी करणे गरजेचे आहे.


सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , ‘कोणत्याही इलेक्ट्रिक डिव्हाईसमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत याचा फॉरेन्सिक विभागाकडून योग्य तपास होत नाही, ते फुटेज नीट तपासले जात नाही. त्याचा योग्य तो अहवाल येत नाही तोपर्यंत कुणीही यावर प्रतिक्रिया देणे हे राजशिष्टाचाराला धरून नाही’

“त्या ” पेन ड्राईव्ह वर शरद पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर बोलताना शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचा काही भाग समजला नाही. सरकारी अधिकाऱ्यांचे १२५ तासांचं रेकॉर्डिंग होते हे कौतुकास्पद आहे. पण केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याशिवाय हे शक्य नाही. आरोपांबाबत खोलात गेलो नाही. आरोपांची राज्य सरकारने चौकशी करावी. माझे अप्रत्यक्षपणे नाव घेतले गेले. पण माझा काही संबंध नाही. रेकॉर्डिंगच्या सत्यतेबाबत पडताळणी करणे गरजेचे आहे. सरकार गेल्यामुळे भाजप अस्वस्थ. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी कशी केली जाते याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहे. सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न आहे. पण सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही. सरकार ५ वर्षे टिकेल असंही शरद पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचे नेमके आरोप काय आहेत ?

सुमारे १२५ तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग २९ वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण २८ लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे. ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत.

दरम्यान पवार साहेबांना कसे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांना संपवायचे आहे, त्यासाठी कोणते निर्देश त्यांना प्राप्त झाले आहेत, हे सर्व करण्यासाठी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय पांडे यांना कसे बसविण्यात आले. त्यासाठी त्यांनी कशी कबुली दिली, याचे संपूर्ण तपशील त्यांनी विस्तृतपणे सांगितले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!