Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : लसीकरणाचा दुसरा डोस न घेतलेल्यांसाठी औरंगाबादेत पुन्हा कडक निर्बंध , नो इंधन , नो राशन …!!

Spread the love

• लसीकरण उद्दिष्टपूर्तीसाठी महसूल,पोलीस,आरोग्य विभागाचे विशेष पथकाची निर्मिती


औरंगाबाद : औरंगाबाद जिल्यातील लसीकरणाचा टक्का वाढत नसल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  औरंगाबादमध्ये पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचा  निर्णय घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर संबंधित व्यक्तीला उद्यापासून पेट्रोल-डिझेल  तसेच गॅस, सीएनजीसुद्धा मिळणार नाही.  याशिवाय विजेची समस्या असेल तरी दोन्ही लस घेतल्याशिवाय सोडवली जाणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू करत असल्याचं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

औरंगाबादची लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. २६ टक्के नागरिकांचे  अद्यापही लसीकरण झालेले  नाही. तर दोन लस घेतलेल्या नागरिकांची संख्या फक्त ५४ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण वाढवण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान पेट्रोल पंपावर लसीकरणाचे  प्रमाणपंत्र तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनातील कर्मचारी किंवा पोलीस असतील. ते कुणाचे  लसीकरण झाले याची शहानिशा करतील. कारण पेट्रोलपंपावर लसीकरणाचे  प्रमाणपत्र कुणी तपासावे  यावरुन गेल्यावेळी संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, आता सरकारी कर्मचारीच पेट्रोलपंपावर लसीकरणाचे  प्रमाणपत्र तपासण्यासाठी असणार आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस याबाबत सतर्कता पाळणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये थोडासा वचक असणार आहे. विशेष म्हणजे पेट्रोलपंपावरही लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

निर्बंधमुक्तीसाठी लसीकरण अनिवार्य : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, सीएनजी व मोफत धान्य पुरवठा मिळणार नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

ग्रामीण भागातील लसीकरण उद्दिष्टपुर्तीसाठी ग्रामीण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वय ठेवून तात्काळ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शेळके यांनी अधिकारी व कर्मचारी यांनी दिले. लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हयात विशेष पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले असून यामध्ये महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस,आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक लसीकरणाचा दुसरा डोस पात्र असूनही डोस न घेतल्याबाबतची तपासणी करून संबधित सुविधा न देण्याची कारवाई बाबत काम करणार आहे. ही कार्यवाही पेट्रोलपंप, घरगुती गॅस सिलेंडर, वितरण एजन्सी, रेशनवरील स्वस्त धान्य दुकान,मॉल, हॉटेल, मोठी दुकाने या ठिकाणी भरारी पथकाद्वारे तपासणी केली जणार आहे. यामुळे लसीकरणाचे प्रमाणे वाढून शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हयात लसीकरण मोहिम राबविण्याबरोबरच जिल्हा कोविड निर्बंध मुक्तीसाठी सदरील उपाययोजना करण्यात येत असल्याचे बैठकीत चव्हाण यांनी सांगितले.

रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेपूर्वी लसीकरण अनिवार्य करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी यांनी नागरिकांची कोविन अँपपवरील नोंदणी अद्यावयत करुन लसीकरण झाल्याची नोंद करावी, तसेच १५ मार्च पर्यंत लसीरकणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबधित उपस्थितांना देण्यात आल्या . आज रोजी जिल्हयातील ८ लाख ९० हजार ९४१  लसीची दुसरी मात्र घेण्यासाठी पात्र असण्याऱ्या नागरिकांनी तात्काळ लस घेण्याबाबतचे आवाहनही प्रशासनामार्फत  जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

या बैठकीत सर्व प्रकाराचे शॉपिंग मॉल, सुपर मार्केट, डी-मार्ट, रिलायन्स आणि मोठ्या दुकानाच्या ठिकाणी दुसऱ्या डोस च्या लसीकरणाचे प्रमाणपत्र अ निवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय , पोलीस अधीक्षक निमीत गोयेल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पासाहेब शिंदे, पोलिस उपायुक्त उज्वला बनकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सुधाकर शेळके उपस्थित होते.तसेच सर्व तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दूरदृश प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!