Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkraineWarUpdate : रशिया -युक्रेन दरम्यान चर्चा जरी मात्र जाहीर केल्या ‘ या’ भूमिका … रशियात आर्थिक आणीबाणी !!

Spread the love

कीव : बेलारूसच्या सीमेवर युक्रेनने रशियाशी चर्चा करण्याचे मान्य केले आहे. आज संयुक्त राष्ट्राच्या आपत्कालीन सत्रात रशिया आणि युक्रेन संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. त्याचवेळी, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही आमची एक इंचही जमीन देणार नाही आणि शरणागतीही पत्करणार नाही तसेच आम्ही आत्मसमर्पण करणार नाही.” दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे कि , “मी संरक्षण मंत्री आणि रशियन सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफला आदेश देतो की रशियन सैन्याच्या प्रतिबंधात्मक दलांना लढाऊ सेवेच्या विशेष मोडमध्ये तयार ठेवावे .”


युक्रेनचे अध्यक्ष बोलोदिमीर झेलेन्स्की आणि बेलारूसचे नेते अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यातील फोनवरील संभाषणानंतर दोन्ही देशांच्या दरम्यान चर्चेचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना झेलेन्स्की म्हणाले कि , “मला या बैठकीच्या निकालावर खरोखर विश्वास नाही, परंतु त्यांना प्रयत्न करू द्या, जेणेकरून नंतर युक्रेनच्या एकाही नागरिकाला शंका नसेल की मी, अध्यक्ष म्हणून, युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला.” ”

संवादातूनच तोडगा निघू शकतो: युक्रेन-रशिया संघर्षावर दलाई लामा

दरम्यान शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी सोमवारी युक्रेनच्या संकटावर शोक व्यक्त करून म्हटले आहे कि , समस्या आणि मतभेदांवर सर्वोत्तम तोडगा केवळ संवादातूनच शोधला जाऊ शकतो .युक्रेनमधील संघर्षामुळे मला खूप दुःख झाले आहे. आपले जग इतके परस्परावलंबी बनले आहे की दोन देशांमधील हिंसक संघर्षाचा परिणाम निश्चितपणे दुसर्‍या देशांवर होईल. तथापि, युद्ध ही आता जुनी पद्धत बनली आहे आणि अहिंसा हा एकमेव मार्ग आहे. इतर मानवांना भाऊ-बहीण मानून संपूर्ण मानवजातीची कल्पना आपण विकसित केली पाहिजे. अशा प्रकारे आपण अधिक शांततामय जग निर्माण करू शकू. परस्पर समंजसपणा आणि एकमेकांच्या हिताचा आदर यातूनच खरी शांतता येते.

रशियात आर्थिक आणीबाणी , व्याजदरात प्रचंड वाढ

युक्रेनविरुद्ध छेडलेल्या युद्धामुळे रशियामध्ये आर्थिक आणीबाणीसदृश्य परिस्थिती ओढवली असून, त्यावर तोडगा म्हणून रशियाच्या मध्यवर्ती बँकेने व्याजाचे दर ९.५ टक्क्यांवरून वाढवून थेट २० टक्के केले आहेत. रशियाचं रुबल हे चलन ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेले असून रशियानं निर्यातदार कंपन्यांना विदेशी चलन विकण्यास सज्ज राहण्यास सांगितले आहे. रॉयटर्सनं या संदर्भात वृत्त दिले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रविवारी लष्कराला युक्रेनविरोधात अण्वस्त्र सज्ज होण्याचे आदेश दिल्यानंतर रुबलची ऐतिहासिक घसरण होत त्याचा भाव एका डॉलरला १२० इतका घसरला. युरोप व अमेरिकेनं रशियाविरोधात आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर रशियाचं चलन आधीच घसरणीच्या मार्गावर होते  ते आणखी घसरले. या सगळ्याचा परिणाम प्रचंड महागाईत होणार हे स्पष्ट असल्याने रशियाच्या मध्यवर्ती बँकेने महागाईचा वाढीचा दर चार टक्क्यांवर ठेवण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आणि त्यामुळेच आर्थिक आणीबाणी म्हणून व्याजाचे दर प्रचंड वाढवले. यामुळे रुबलचे अवमूल्यन व महागाईचा धोका कमी होईल अशी आशा बँकेने व्यक्त केली आहे.

रशियन नागरिकांच्या बचत केलेल्या पैशाचं अवमूल्यन या निर्णयामुळे होणार नाही व त्यांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज मिळेल व परिणामी आर्थिक स्थैर्य राहील असा अंदाज आहे. यापूर्वी जेव्हा रशियाने  युक्रेनकडून क्रिमीयाचे  विलिनीकरण केले  होते  तेव्हा २०१४ मध्ये १७ टक्क्यांच्या वर व्याजाचे दर झाले होते. आता युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं रशियातील बँकांचा स्विफ्ट प्रणालीशी संबंध तोडल्यानंतर आता रशियावर पुन्हा तीच वेळ आली आहे. रशियाच्या सांगण्यानुसार युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्यात आली असून प्रदेश गिळंकृत करणे हा हेतू नाहीये. या देशाच्या लष्करी सामर्थ्याचा बीमोड करणे आणि विघातक राष्ट्रवादी शक्तींना नेस्तनाबूत करणे हा आपला उद्देश असल्याचं रशिया सांगत आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी बाह्य घटक आमूलाग्र बदलले असल्याचे व्याजदर वाढवताना रशियाच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!