Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यपालांच्या ‘त्या ‘ विधानावरून संतप्त प्रतिक्रिया, जाहीर माफीची केली जात आहे मागणी…

Spread the love

सातारा : राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकिचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.


औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना , ” समर्थ के बिना , शिवाजी को कौन पूछेगा ? ” असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते. राज्यपालांच्या या विधानावर आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद उफाळला आहे. आता खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यपालांवर टीका केली आहे.

शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजाऊ

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांनी माफी मागावी  मागणी केली. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा व्हिडिओ ट्वीट करत कोश्यारींना उत्तर दिले आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत एका जाहीर सभेदरम्यान शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू कोण हे स्पष्टपणं आपल्या भाषणात सांगितलं आहे.

शरद पवार म्हणतात …

शरद पवार यांनी म्हटले आहे  की, जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं… रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती,त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली. आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे, हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले.

रोहित पवारांकडून राज्यपालांच्या माफीची मागणी

दरम्यान या प्रकरणात ट्विट करताना रोहित पवार यांनी म्हटले आहे कि , खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे. खरा इतिहास माहित करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे. असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागावी.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!