Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : सराफाला लुटणार्‍या टोळीचा म्होरक्या मुद्देमालासह गुन्हेशाखेच्या जाळ्यात, अन्य चौघे फरार

Spread the love

औरंगाबाद -लुटीचे सोने विक्रीसाठी सोनाराकडे नेतांना गुन्हेशाखेने रेकाॅर्डवरचा गुन्हेगार पकडला.हर्सूल पोलिस ठाण्यात ठाण्यात असलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला. सुनिल उर्फ सोनू मुरलीधर मगर (२५) रा.गारखेडा असे अटक आरोपीचे नाव आहे.त्याच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तीन तर एक सिडको औद्योगिक पोलिस ठाणे व एक छावणी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.आणखी ४ साथीदारांना सोबंत घेत काटशेवरी फाट्यावरील कार्तिक ज्वेलर्स चा मालक शैलेश एकनाथ टाक याला २२फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५च्या सुमारास रसुलपुरा घाटात लुटले होते , अशी कबुली अटक आरोपीने पोलिसांना दिली.


पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्या बरोबर  नितीन कल्याण ससाणे हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगारही होता. तर अन्य तिघे रवि उर्फ हरि संजय जाधव,रा.जयभवानीनगर,नितीन सदाशिव डांगे रा.न्यू गणेशनगर,विकास जनार्दन भडके रा पडेगाव यांचा फरार आरोपींमधे समावेश आहे वरील तिघे हे.प्रथमच या धंद्याकडे वळल्याची माहिती अटक आरोपीने पोलिसांना दिली.

तब्बल २० दिवस रेकी

अटक आरोपी सुनिल मगर ने काटशेवरी फाट्यावरील कार्तिकी ज्वेलर्स ची तब्बल २०दिवस रेकी केली.फिर्यादी टाक हा दुकान बंद करुन सुसाट वेगाने घरी परतत असे. पण गुन्हा घडला त्या दिवशी टाक च्या मोटरसायकलचा वेग कमी आहे हे लक्षात येताच आरोपी मगर ने टाकच्या मोटरसायकलला मागून रसुलपुरा घाटात धडक दिली. त्याच्या सोबत चारही आरोपी दोन मोटरसायकलवर होते. ते सर्व धडक दिल्यामुळे खाली पडले. म्हणून आरोपींनी टाक याला मारहाण करंत त्याच्या जवळील ४ लाख रु.चा मुद्देमाल हिसकावून पळळ काढला. मात्र घटनास्थळी कोणतेही सी.सी.टि.व्ही.नसल्यामुळे आरोपींना शोधणे अवघंड होते.

दरम्यान शेवटी पीएसआय कल्याण शेळके यांनी चोरीचे सोने खरेदी करणार्‍या सोनारांकडे खबर्‍यामार्फत माहिती घेतली. तर रोकडिया हनुमान काॅलनीतील एका सराफाकडे आरोपी मगर चोरीचे सोने विकण्यासाठी येत असल्याचे कळले.मगर ला संशयावरुन ताब्यात घेतल्यावर त्याने रसुलपुरा घाटात अन्य मदतीने सराफाला लुटल्याचे मान्य करंत चोरीचा मगर च्या हिश्शाला आलेला मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. वरील कारवाई पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता , पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके,एएसआय रमाकांत पटारे,पोलिस कर्मचारी संदीप सानप, विजय निकम,नितीन देशमुख यांनी पार पाडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!