Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Abhivyakti : blog : स्तंभलेख : श्रीमंत कोकाटे : समजून घ्यावे असे काही : रामदास ‘संत’ नव्हे, स्वराज्यातील विषमतावादी ‘जंत’ होता !

Spread the love

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादेत एका कार्यक्रमात बोलताना  छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांचा सर्वत्र निषेध केला जात आहे . वास्तविक समर्थ रामदास कोण होता ? यांबद्दल इतिहास संशोधक डॉ . श्रीमंत कोकाटे यांचा हा विशेष लेख येथे देत आहोत. डॉ . कोकाटे यांनी आपल्या या विशेष लेखात म्हटले आहे कि , राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बेताल, निराधार वक्तव्य करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यांनी काल औरंगाबादच्या सभेत “रामदास गुरु होते म्हणून शिवाजी मोठे झाले, अन्यथा शिवाजीला कोणी विचारले नसते” असे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केलेला आहे. रामदासाला शिवाजीराजांचे गुरु संबोधने ही विकृती आहे, हा वेडेपणा आहे. त्यांनी असे वक्तव्य करून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. शिवरायांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांनी माफी मागावी !


छत्रपती शिवाजीराजांसारखा राजा जगाच्या इतिहासात झाला नाही. काही लोक शिवाजीराजांची तुलना नेपोलियन, सिकंदर, सिझर यांचेशी करतात. सिकंदर, नेपोलियन, सीझर पराक्रमी होते, पण छत्रपती शिवाजीराजांच्या ठायी असणारी नैतिकता नेपोलियन, सिकंदराकडे नव्हती. त्यामुळे शिवाजीराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, शिवाजीराजांची तुलना फक्त शिवाजी महाराजांशीच होऊ शकते इतके ते महान जागतिक कीर्तीचे राजे आहेत. ते लोककल्याणकारी होते. त्यांनी शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर केला. त्यांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही, ते समतावादी होते. ते ग्रंथप्रामाण्यवादी नव्हते, तर ते बुद्धीप्रामाण्यवादी. ते शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा ठेवू नका, इतके ते निस्वार्थी होते. त्यांच्या राज्यात दारूला प्रतिष्ठा नव्हती. त्यांनी आपल्या राज्यातील सर्व धर्मीयांना आनंदाने नांदू दिले, असे समकालीन पोर्तुगीज व्हाईसरॉय त्याच्या देशातील राजाला कळवितो. त्यांनी आपल्या राज्यात गुलामगिरीच्या प्रथेला बंदी घातली. शिवाजीराजांचे कार्य वैश्विक कीर्तीचे आहे.

शिवाजीराजांच्या कार्याचे श्रेय घेण्यासाठी सनातन्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या गुरुस्थानी रामदास आणि दादोजी कोंडदेव बसविले. परंतु समकालीन राधामाधवविलासचंपू, पर्णालपर्वतग्रहाणाख्यान, जेधे शकावली, शिवभारत या महत्त्वाच्या ऐतिहासिक ग्रंथात रामदास आणि दादोजी कोंडदेव यांचा साधा नामोल्लेख देखील नाही.

शिवाजीराजांसारखा महापुरुष आपल्या जातीत झाला नाही, याचा न्यूनगंड ब्राह्मणी व्यवस्थेला आहे. त्या न्यूनगंडातूनच शिवरायांच्या कार्याचे श्रेय घेण्यासाठी त्यांच्या गुरुस्थानी रामदास आणि दादोजी कोंडदेव हे दोन ब्राह्मण आणून बसवलेले आहेत. कथा ,कादंबऱ्या, चित्रपट, मालिका, पाठ्यपुस्तके, शिल्पे याद्वारे हा खोडसाळ प्रचार सातत्याने करण्यात आला. पण या खोडसाळ प्रचाराचे महात्मा फुले, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वा. सी. बेंद्रे, त्र्यंबक शंकर शेजवलकर, डॉ. जयसिंगराव पवार इत्यादी अभ्यासकांनी वैचारिक पद्धतीने खंडन केलेले आहे.

महात्मा फुले म्हणतात…

मासा पाणी खेळे , गुरु कोण असे त्याचा ?

ज्याप्रमाणे मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो, त्याला बाह्य शिक्षणाची गरज नसते. त्याच्या पिढ्यानपिढ्या पाण्यात आहेत, तो उस्फूर्तपणे पोहायला शिकतो. तसं शिवाजीराजांच्या पिढ्यानपिढ्या तलवार चालवतात, रणांगण गाजवतात, राजनीतिमध्ये निपुण आहेत. आजोबा मालोजीराजे, वडील शहाजीराजे, आई जिजाऊ तलवारबाजी, राजनीति यामध्ये पारंगत होत्या. त्या जिजाऊचा पुत्र शिवाजी राजांना कुठल्याही रामदास किंवा दादोजी कोंडदेवने प्रेरणा देण्याची गरजच नव्हती, असे महात्मा फुले त्यांच्या पोवाड्यामध्ये लिहितात. तर शाहीर अमर शेख लिहितात.

पेरावं तेच पीक येतं |
जगाची रीत |
नवं नाही त्यात l
शहाजीने पराक्रम पेरला l
शिवाजी राजा अवतरला l
मराठ्यांचा भाग्योदय झाला l
आला आला शिवाजी आला l
योग्य समयाला l
जिजाईन दिला l
थोर त्या मातेचे उपकार l
थोर त्या आईचे उपकार l
मराठ्यांनो तुमच्या न नाही फिटणार l
जी जी जी जी ssss l

असे नामवंत शाहीर अमर शेख लिहितात

रामदास हा शिवरायांचा गुरु, मार्गदर्शक, प्रेरक किंवा कल्पक नव्हता. हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. शिवकालीन, अस्सल, ऐतिहासिक साधनात तसा कोणताही पुरावा नाही. जेधे शकावली, शिवभारत, राधामाधावविलासचंपू, पर्नालपर्वताग्रहणाख्यान, बुधभूषण इत्यादी अस्सल साधनात त्याचा उल्लेख देखील नाही.डॉ. प्र. न. देशपांडे यांनी संपादित केलेल्या ‘छत्रपती शिवाजीराजांची पत्रं’ यामध्येही तसा उल्लेख नाही.

रामदास हा गुरु तर नव्हताच, याऊलट तो जातीयवादी आणि विषमतावादी होता. ब्राह्मणी वर्चस्वासाठी त्याने हयात घालवली. ब्राह्मणेतरानी ज्ञानार्जन करू नये, हा रामदासाचा आग्रह होता. गुरु हा फक्त ब्राह्मणच असू शकतो, इतरांना तो अधिकार नाही, ब्राम्हण कर्तृत्ववान नसला तरी त्यालाच गुरु केले पाहिजे, असे रामदासाचे मत होते

गुरु तो सकळाशी ब्राह्मण।
जरी तो झाला क्रियाहीन।

सर्वांनी ब्राह्मणाला वंदन केले पाहिजे, ही वेदांचीच आज्ञा आहे, याबाबत रामदास म्हणतो.

सकळाशी पूज्य ब्राह्मण।
हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण।

सर्वांनी ब्राह्मणाला जेवण दिले पाहिजे, याबाबत तो म्हणतो

लक्षभोजनी ब्राह्मण।
आन जातीस पुसे कोण।

रामदास म्हणतो ब्राह्मणाला देव वंदन करतात तेथे माणूस काय चीज आहे. देव वंदन करतात माणसांनी तर केलेच पाहिजे असे रामदासाचे मत आहे.

असो ब्राह्मण सुरवर वंदिती।
तेथे मानव बापुडे किती।

ब्राह्मण मूर्ख असला तरी त्याला जगाने वंदावे, असे तो म्हणतो.

जरी ब्राह्मण मूढमती ।
तरी तो जगतवंद्य।

ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत बाकी सर्व मूर्ख आहेत, असे रामदास म्हणतो. ब्राह्मणेतरांना तुच्छ लेखणाऱ्या रामदासाचे चरणस्पर्श करायला शिवरायांसारखे समतावादी राजे जातील का?.

ब्राह्मणाचा मुलाहिजा न बाळगणारे शिवाजीराजे जातीयवादी रामदासाच्या पायावर लोटांगण घालतात, अशी कल्पना करणे देखील महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला कमीपणा आणणारे आहे. १६७५ साली प्रभावळीच्या सुभेदाराला पाठवलेल्या पत्रात शिवाजी राजे म्हणतात “ब्राह्मण म्हणून तुमचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही” आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पाडणाऱ्या ब्राह्मण सुभेदाराला सुद्धा छत्रपती शिवाजीराजांनी तुमची गय केली जाणार नाही, असे सुनावले होते.

शिवरायांनी आपल्या राज्यात कधी भेदाभेद केला नाही, प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात समतेसाठी शिवाजी-संभाजीने बलिदान दिले. रामदासाचे संपूर्ण जीवन जातिभेदाने ओतप्रोत भरलेले आहे.रामदास म्हणतो,

अंत्यज शब्दाज्ञाता बरवा।
परी तो नेवून काय करावा।
ब्राह्मण सन्निध पुजावा।
हे तो न घडे की।

दलित हा ब्राह्मणाची बरोबरी करू शकत नाही. असे रामदास म्हणतो, तर शिवरायांनी दलितांना अत्यंत मानाच्या आणि महत्वाच्या पदावर नेमले. जातीयवादी रामदासाची समतावादी शिवाजीराजांच्या पायताणाजवळदेखील बसायची लायकी नव्हती. त्याच्या चरणावर डोके ठेवायला शिवाजी महाराज कांही बाळबोध नव्हते. रामदास दलिताबाबत पुढे म्हणतो,

अंतर एक तो खरे।
परी सांगाते घेऊ न येती महारे।
पंडित आणि चाटी पोरे।
एक कैसी।
मनुष्य आणि गधडे।
राजहंस आणि कोंबडे।
राजे आणि माकडे।
एक कैसी।

रामदास म्हणतो “ब्राम्हण म्हणजे विद्वान मानव, राजहंस, राजा आहे तर दलित म्हणजे उनाड,गाढव, माकडे, कोंबडे आहेत” अशा प्रकारे महार आणि ब्राह्मण एक होऊ शकत नाहीत, असा रामदास जातिभेद वृद्धीगत करतो. खरे तर रामदास आणि त्याचे उदात्तीकरण करणारावर ऍट्रॉसीटी केली पाहिजे, इतका तो जातीयवादी होता. असे जातीय विष पेरणाराला समतावादी शिवाजी महाराज मदत देतात, असे सांगणे, हा महाराजांचा अपमान आहे.

शिवाजीराजानी शत्रूंच्या महिलांचादेखील सन्मान केला. आपल्या मातेचा, महाराण्याचा आदर केला. रामदास सावधान म्हणताच लग्नमंडपातून पळून गेला. महान साहित्यिक ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणतात की लग्नमंडपात राहून गेलेली रामदासाची बायको हातात पायताण घेऊन रामदासाला शोधून काढेल व मनाचे श्लोक लिहिणाऱ्या रामदासाला पायताण दाखवून जनाचा श्लोक एकवेल.

मनाची नको ठेवू जरी लाज तू।
जनाची तरी ठेवी पळपुट्या नागड्या थू।

महिलांचा अनादर करणारा रामदास होता, तर शिवाजीराजे महिलांचा सन्मान करणारे राजे होते.

रामदास हा विषमतावादी होता, त्यामुळे त्याला वारकरी पंथात स्थान नाही, पण अलीकडच्या काळात त्याला वारकरी पंथात घुसडण्याचा प्रयत्न सुरु आहे. रामदास हा महाराष्ट्राच्या पोटात घुसलेला जंत आहे, ज्याप्रमाणे जंत पोटासाठी अत्यंत अपायकारक असतो, तस महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी रामदास, रामदासी साहित्य आणि रामदासी संप्रदाय अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या जंताला कायमचे बाहेर काढले पाहिजे.

रामदासाला पुन्हा पुन्हा शिवरायांच्या गुरुस्थानी थापण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याची आणि शिवरायांची कधीही भेट झाली नाही, असे महान इतिहासकार सांगतात. समजा भेट झाली असे गृहीत धरले, तरी तो गुरु होऊ शकत नाही. कारण सार्वजनिक जीवनात अनेक लहान मोठे लोक एकमेकांना भेटत असतात, म्हणून ते एकमेकांचे गुरु होऊ शकत नाहीत, केवळ भेट हाच गुरु-शिष्य यासाठी निकष नाही. जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु आहेत.

गुरुपदासाठी अट्टाहास का? डॉ आंबेडकर त्यांच्या ‘जातिनिर्मूलन’ या अभिजात ग्रंथात म्हणतात की “ब्राह्मणात कोणीही क्रान्तीकारक/महापुरुष झाला नाही.” त्यामुळे सनातन्यांनी एक युक्ती शोधून काढली, आपल्यात कोणी महापुरुष झाला नाही तर मग आपण महापुरुषांचे गुरुच होऊन टाकायचे, म्हणजे आपोआप बहुजन महापुरुषांच्या कार्याचे श्रेय ब्राह्मणाकडे जाते आणि बहुजनांवर वर्चस्व प्रस्थापित करता येते. शिवाजीराजानी रामदासाला दान दिले, म्हणजे आजच्या राज्यकर्त्यांनी ब्राह्मणभोजन, ब्राह्मणांना देणग्या, ब्राह्मणांना पुरस्कार दिले पाहिजेत, ही बिगर श्रमाची भिकारडीवृत्ती जोपासण्यासाठी शिवरायांनी रामदासाला देणग्या दिल्या, असा सांगण्याचा ब्राह्मणी खटाटोप आहे, रामदासाचे उदात्तीकरण करण्यासाठी रामदासी संप्रदायाने अनेक खोट्या कथा तयार केलेल्या आहेत, हे शिवरायांचे मावळे समजून घेतील, ही अपेक्षा!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बेताल, निराधार वक्तव्य करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यांनी काल औरंगाबादच्या सभेत “रामदास गुरु होते म्हणून शिवाजी मोठे झाले, अन्यथा शिवाजीला कोणी विचारले नसते” असे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केलेला आहे. रामदासाला शिवाजीराजांचे गुरु संबोधने ही विकृती आहे, हा वेडेपणा आहे. त्यांनी असे वक्तव्य करून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. शिवरायांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांनी माफी मागावी!

डॉ. श्रीमंत कोकाटे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!