Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : बारावीची परीक्षा देताय ? मग हा बदल लक्षात घ्या…

Spread the love

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या बदलानुसार दिनांक ५ आणि ७ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.


मंडळाने जाहीर केल्याप्रमाणे इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक  ४ मार्च रोजी सुरू होणार आहे. पण यातील ५ मार्च रोजी होणारा पेपर आता ५ एप्रिल रोजी, तर ७ मार्च रोजी होणारा पेपर ७ एप्रिल रोजी होणार आहे. काल पुणे-नगर मार्गावर पुण्याच्या दिशेने येत असताना एका ट्रकला आग लागली होती. या ट्रकमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. जळून खाक झालेल्या प्रश्नपत्रिका याच विषयांच्या असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे.

आधीच्या वेळापत्रकानुसार दिनांक ५ मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन, जपानी, चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर, ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. हे पेपर आता ५ एप्रिल रोजी होणार आहेत.

आता नव्या निर्णयानुसार ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. ते आता ७ एप्रिल रोजी होतील असे सांगितले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!