Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad NewsUpdate : पत्रकारितेतून योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जावी : न्या.चपळगावकर

Spread the love

छायाचित्रात – मंगला विंचुर्णे- बर्दापूरकर पारितोषिक न्या . नरेंद्र चपळगांवकर यांच्या हस्ते स्वीकारताना अपूर्वा खैरनार . छायाचित्रात तिची आई संगीता , वडील गिरीश खैरनार आणि कुलसचिव डॉ . आशीष गाडेकर हेही दिसत आहेत .

एमजीएमच्या अपूर्वा खैरनारला मंगला विंचुर्णे- बर्दापूरकर पारितोषिक प्रदान

औरंगाबाद : पत्रकारितेचा काळ एका बाजूने खूप वाईट तर दुसऱ्या बाजूने तितकाच चांगलाही आहे. रवीश कुमारसारख्या पत्रकाराला धमक्या येत असतानाच नोबेलसारख्या पुरस्कारानेही पत्रकाराचा गौरव होत आहे. पत्रकारिता हा श्रमाचा भाग आहे. वाचकांना योग्य माहिती देण्याचा आनंद पत्रकारांनी घ्यायला हवा, अशी भावना सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केली.

महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाच्या वतीने द्वितीय मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर स्मृती पारितोषिक वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाची विद्यार्थीनी अपूर्वा खैरनारला न्या. चपळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.

एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, नंदिनी चपळगावकर, ज्येष्ठ संपादक आणि लेखक प्रवीण बर्दापुरकर, कुलसचिव आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा गांधी मिशनच्या वतीने न्या.नरेंद्र चपळगावकर यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. दिवंगत पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २०२१ पासून पत्रकारिता अभ्यासक्रमातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थीनीला हे पारितोषिक दिले जाते. ११ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रमुख अतिथी न्या.चपळगावकर पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना म्हणाले, मी साठच्या दशकात केसरी, इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नलसाठी बातमीदारी केली. आपली अक्षरे बातमीच्या रुपात छापून येण्याचा आनंद निराळाच होता. छापील अक्षरांना तेव्हा असलेले महत्व आणि प्रतिष्ठा आजही आहे का, याचा विचार करायला हवा. आजच्या पत्रकारांनी प्रसिद्धी अधिकारी आणि आपल्यातील फरक ओळखावा. सुखवस्तू पत्रकारिता चैनीची आहे पण नोबेलविेजेती पत्रकार रेसाने निवडलेला मार्ग खडतर आहे. पत्रकारिता हा श्रमाचा भाग असून वाचकांना उत्तम माहिती देण्याचा आनंद पत्रकारांनी घ्यायला हवा, अशी भावनाही न्या.चपळगावकर यांनी व्यक्त केली.

डॉ. विलास सपकाळ

एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ अध्यक्षीय समारोपात म्हणाले, विद्यापीठ हे पत्रकारितेच्या सर्व बीट्सचे शिक्षण देणारे एकमेव ठिकाण असते. इंग्रजीसोबत अन्य विदेशी भाषांमध्येही पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू करण्याची एमजीएम विद्यापीठाची योजना आहे. अशा पुरस्काराच्या माध्यमातून नाविन्यपूर्णता आणून उच्च पातळी गाठण्याची प्रेरणा मिळते. होतकरू विद्यार्थ्यांनी या प्रेरणेतून आपले करिअर घडवावे. प्रवीण बर्दापूरकर यांनी पुरस्कारामागील भूमिका मांडली. तर, कुलपती अंकुशराव कदम आणि विश्वस्त प्रतापराव बोराडे, प्रा.डॉ. रेखा शेळके, अपूर्वा खैरनार यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रा. दिव्या कांबळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. आशा देशपांडे यांनी आभार मानले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!