Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationNewsUpdate : दहावी , बारावीच्या सर्व बोर्डांच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !!

Spread the love

मुंबई : कोरोनाचे कारण पुढे करीत ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांचा विरोध असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशी मागणी करण्यात येत होती तर विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे सरकारने जाहीर करताच विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते. दरम्यान सीबीएसई, सीआयएसई आणि स्टेट बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षांना आवाहन देणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टन फेटाळली आहे आणि याचिकाकर्त्यांना कडक शब्दात सुनावले आहे.


दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यभरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षांच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले होते. या प्रकरणात वकील आणि बाल हक्क कार्यकर्ते अनुभा सहाय श्रीवास्तव यांनी ऑनलाईन परीक्षांच्या विरोधात एक याचिकाही सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. याच याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. मात्र हि याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

सीबीएसई, सीआयएसई आणि स्टेट बोर्डाने विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा न घेता गेल्यावेळी प्रमाणे मूल्यमापनाच्या पद्धतीचा वापर करावा आणि निकाल त्या पद्धतीने जाहीर करण्यात यावा असे आदेश कोर्टाने शिक्षण मंडळांना द्यावेत अशी याचिका करण्यात आली होती. मात्र यावर सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे कि , ” परीक्षांबाबत योग्य तो निर्णय फक्त प्रशासनाला घेऊ द्या. अशा याचिका फक्त विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्यासाठी असतात. मुळात या याचिकला प्रसिद्धी दिली कोणी? यामुळे विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होते. यानंतर अशाप्रकारच्या याचिका दाखल करू नका.” अशा खड्या शब्दांमध्ये न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!