Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AhmedabadSerialBlastNewsUpdate : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ जणांना फाशी तर ११ जणांना आजन्म कारावास

Spread the love

 अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली असून इतर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. कोर्टाने ७७ पैकी २८ आरोपींची सुटका केली होती. त्यामुळे या ४९ आरोपींना काय शिक्षा दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार कोर्टाने आज निर्णय दिला असून ३८ जणांना फाशी तर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


२६ जुलै २००८ रोजी फक्त एका तासात अहमदाबाद नगर पालिका क्षेत्रातील तब्ब्ल २१ बॉम्बस्फोट झाले झाल्यामुळे सर्व देश हादरून गेला होता. अया स्फोटात ५६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० जण जखमी झाले होते. अहमदाबाद पोलिसांनी याप्रकरणी २० तर सूरत पोलिसांनी १५ गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांना तात्काळ सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये २० तर सुरतमध्ये १५ गुन्हे दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्हे मर्ज करून एकत्रित खटला भरवण्यात आला होता.

अवघ्या १९ दिवसांत ३० दहशतवाद्यांना अटक

यानंतर २८ जुलै रोजी गुजरात पोलिसांची एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. या पोलीस पथकानं अवघ्या १९ दिवसांत ३० दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना वेळोवेळी अटक करण्यात आली. अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या याच दहशतवाद्यांनी जयपूर आणि वाराणसीमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जुलैला सूरतमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखला होता. पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे स्फोट होऊ शकले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ७७ जणांना अटक केली होती. यातील ४९ जणांना गुजरात न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यापैकी 38 जणांना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्याचा निकाल  २ फेब्रुवारीला येणार होता. पण न्यायमूर्ती ए आर पटेल यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे ८ फेब्रुवारीपर्यंत तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ८ फेब्रुवारीला सर्वांना दोषी ठरवण्यात आले .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!