Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News update : अखेर ठरलं !! क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्या लोकार्पण; भाजपचा मात्र विरोध

Spread the love

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच पालकमंत्री सुभाष देसाई हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतऱ्याचे व परिसराचे सौदर्यींकरण महानगरपालिकेने पूर्ण केले असल्याचे पालकमंत्री कार्यालयाने कळविले आहे.

भाजपचा मात्र विरोध

दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी मात्र या कार्यक्रमाच्या वेळेवरच शिवसेनेवर निशाणा साधला आहे. याबाबत प्रसिध्द केलेल्या पत्रकात केणेकर यांनी म्हटले आहे की, येत्या दोन दिवसावर सरकारी शिवजयंती आली असताना महाविकास आघाडी शिवसेना सरकारने एकदाचे घाईगडबडीने का होईना उसने अवसान आणून संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण चा मुहूर्त काढला आहे.

केणेकर यांनी पुढे म्हटले आहे की, मुहूर्त काढण्याची संस्कृती कोणत्या धर्माची होती ही कळलेच नाही. हा मुहूर्त म्हणजे “जुम्मे के दिन रात के १२ बजे” या इस्लामी नीती नियमांच्या संस्कृतीप्रमाणे इस्लाम संस्कृतीमध्ये शुक्रवार हा मुस्लिम पवित्र दिवस मानला जातो. खरे तर मोगल औरंगजेबाच्या फौजांनी मध्यरात्री हिंदू वस्तीवर हल्ले करून स्वराचार, अनाचार, अत्याचार, माजवला होता त्या सर्वांचा सत्तेचा जुलमी माज संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदू जनमाणसाच्या जीवनात सूर्योदयाची पहाट निर्माण केली आणि त्याच सूर्योदयाच्या धगधगतेचा ज्वालेचा रंग म्हणून भगवा ध्वज खांद्यावर घेतला.

ज्या हिंदू संस्कृतीत सूर्योदयाला उदय आहे आणि सुर्यास्ताला अस्त आहे. अशी संस्कृती जतन करण्या ऐवजी पतन केले म्हणून शिवसेनेने इस्लामी संस्कृतीच्या विचाराने मुहूर्त काढला आहे. कारण यांच्या डोक्यात सत्ते करिता ‘जगणे की’ रात्र आहे. महाराष्ट्राची जनता यांच्या सत्तेचा यांच्या विचाराप्रमाणे लवकरच यांचाही अस्त करेल.आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनता या मुहुर्ताचा खेद व्यक्त करत आहे. म्हणून मी भारतीय जनता पार्टी संभाजीनगर शहरजिल्हा अध्यक्ष या नात्याने संभाजीनगर तर्फे खेद व्यक्त करत आहे असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!