Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

State Assembly Election Update : गोव्यात ७५ टक्के, उत्तराखंडमध्ये ५९ टक्के तर उत्तर प्रदेशात ६० टक्के मतदान

Spread the love

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज  गोवा, उत्तराखंडमधील सर्व जागांसह उत्तर प्रदेशातील ५५ जागांसाठी मतदान पार पडले.  यामध्ये  गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत.


दरम्यान आज गोवा विधानसभा निवडणुकीच्या सर्व ४० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गोव्यात ७५.२९ टक्के , उत्तराखंडमध्ये ५९.३७ टक्के तर उत्तर प्रदेशात ६०.४४ टक्के मतदान झाले असल्याचे वृत्त आहे.  गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात ३०१ उमेदवार रिंगणात होते.  गोव्यासह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हा १० मार्चला लागणार आहे. आता त्यावेळी अधिक चित्र स्पष्ट होईल.

गोव्यातील महत्वाच्या लढती

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. निवडणुकीत भाजपला २२ हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई (GFP) यांचा समावेश आहे. सुदिन ढवळीकर (MGP), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि AAP चे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमित पालेकर यांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूकपूर्व युतीची घोषणा केली आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवत आहे.
२०१७ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता

दरम्यान गोव्यात गेल्यावेळी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. काँग्रेसने निवडणुकीत १७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने १३ आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP)ने ३ जागा जिंकल्या होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!