Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraShivJayantiUpdate : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जरी केल्या ‘या’ सूचना…

Spread the love

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौड मध्ये  २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. दरम्यान , आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.


शनिवारी दि. १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.
त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे आणि तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योत दौडीत २०० जणांना सहभागी होता येईल. तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्यात ५०० जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

दरम्यान कोरोनाची लाट ओसरल्यामुळे लवकरच महाराष्ट्र अनलॉक  होत असून मुख्यमंत्र्यांनी उत्साहात शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केल्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती  आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!