Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : महापालिकेच्या नव्या कराला व्यापाऱ्यांचा विरोध, आंदोलनाचा इशारा

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद मनपातर्फे आकारण्यात येणाऱ्या नवीन शुल्काच्या विरोधात व्यापारी महासंघाने आक्रमक पवित्रा घेत या शुल्काच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ चे अध्यक्ष विजय जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाशी संलग्न असलेल्या 93 संघटनांचे अध्यक्ष सचिव तालुका अध्यक्ष व प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


या विषयावरील तातडीची बैठक औषधी भवन येथे पार पडली या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने ठराव पारित करून मनपातर्फे अन्यायकारक नवीन कर वसुली विरोधात लोकशाही मार्गाने जन आंदोलन करावे असे ठरले कारण महानगरपालिका मालमत्ता कर आकारणी करतांना निवासी व व्यावसायिक  अशा  दोन वेगळया दराने कर वसुली करत आहे. यामध्ये व्यवसायीकांकडून (अस्थापनांकडून) व्यावसायीक दराने मालमत्ता शुल्क वसूल केल्या जात असतांना परत त्याच व्यापा-यांकडून नवीन आस्थापना परवाना शुल्क घेणे योग्य होणार नाही. व्यवसाय सुरु करताना राज्य शासनाचे शॉप अॅक्ट नोंदणी व नोंदणी शुल्क बंधनकारक आहे असे असताना महापालिकेने स्वतःचे उत्पन्न वाढवण्याकरीता परत व्यापा-यांकडून नव्याने शुल्क भरुन घेणे व नोंदणी करणे हे अनाकलनीय व अन्यायकारक आहे.

नवीन कर लावणे अन्यायकारक

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारी मुळे आधीच व्यापारी अडचणीत आला आहे, त्यामुळे या काळात सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे आणि अशाच परिस्थितीत आपण व्यापा-यांच्या व्यवसायावरवर अजून हा नवीन कर लागू केल्यास सर्व व्यापारी अजून जास्त अडचणीत येणार आहे आणि त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. त्याचा परिणाम शहरातील सर्व छोट्या-मोठ्या व्यापा-यांवर आणि नागरिकांवर सुध्दा होईल. आम्ही व्यापारी म्हणून शासनाकडे सर्व प्रकारचे कर जसे की मनपा मालमत्ता कर, जीसटी, इन्कॅम टॅक्स, व्यवसाय कर आणि इतर कर शासनास भरत असताना हा नवीन अस्थापना नोंदणी कर भरणे शक्य नाही हा कर लावणे अन्यायकारक होईल, असे व्यापाऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष विजय जयस्वाल, महासचिव शिवशंकर स्वामी, जयंत देवळानकर, जगन्नाथ काळे, सरदार हरीसिंग, लक्ष्मीनारायण राठी, संजय कांकरीया, ज्ञानेश्वर खर्डे, अजय मंत्री, गुलाम हक्कणी, निरज पाटनी,कचरू वेळजकर, सुनील अजमेरा , पैठण तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले , तसेच कपडा असो. चे युसूफ भाई मुकाती,केमिस्ट अँड ड्रगिस्ट् असोसिएशनचे पदाधिकारी ,निखील सारडा,सुनील देशमुख, तसेच नंदकिशोर काळे ,अमित जालनावाला, जगदीश एरंडे दिनेश शिरोळे मुकुंद सांगवीकर अविनाश चौधरी ,विकास राऊत लालाभाई पारीख, AISA चे अध्यक्ष मंगल भाई पटेल तसेच तालुका व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि औरंगाबाद शहरातील इतर सर्व व्यापारी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी,
इत्यादींची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!