Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा

Spread the love

अमरावती : राज्याचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन  महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.


चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निकाल देत असताना  बच्चू कडू यांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठवला आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी कि , २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीची माहिती देताना  त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती.

बच्चू कडू यांच्याकडे मुंबईत सुमारे ४२ लाख ४६ हजार रुपयांचा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट होता. मात्र २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडुकीत त्यांनी या फ्लॅटची माहिती लपवून ठेवली होती. दरम्यान, त्यावरून तक्रार करणारे गोपाल तिरमारे यांनी माहितीच्या अधिकारामधून याबाबतची माहिती मिळवली होती. त्याआधारावर त्यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात अंधेरी येथे 2011 मध्ये सदनिका विकत घेतली परंतु ही माहिती त्यांनी शपथ पत्रात दिली नव्हती.  या गंभीर प्रकरणी चांदूरबाजार तालुक्याचे भाजप सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी 27 डिसेंबर 2017 रोजी आसेगाव पोलिसात तक्रार दिली होती या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पाच वर्षांनी शुक्रवारी चांदूरबाजार येथील प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालय क्रमांक १ यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सरकारी वकील वानखडे यांनी बाजू मांडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!