Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळणाऱ्या आरोपीला आजन्म कारावास

Spread the love

वर्धा : दोन वर्षांपूर्वी हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुण प्राध्यापिकेला जिवंत जळणारा आरोपी विकेश नगराळे याला आजन्म कारावासाची  शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी अर्थात ९ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर आरोपीला दोषी ठरावत न्यायालयाने अंतिम निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयाने आरोपीला हि शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

या विषयीची माहिती देताना उज्वल निकम म्हणाले कि , “आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ३ फेब्रुवारी २०२०ला त्याला अटक करण्यात आली होती. पण या दोन वर्षांच्या कालावधीची त्याला शिक्षेत सूट मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मरेपर्यंत जन्मठेप असा जन्मठेपेचा अर्थ होत असल्यामुळे आणि विकेश नगराळेच्या गुन्ह्याचं क्रौर्य पाहून त्याला २ वर्षांची सूट मिळणार नाही. शिवाय त्याला ५ हजारांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सुनावला आहे”.

काल बुधवारी हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निकाल आजसाठी राखून ठेवला होता. आज संध्याकाळी पाचच्या सुमारास या निकालाचं वाचन करण्यात आले . या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात ६४ सुनावणी दरम्यान २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.

त्या दिवशी घटना

हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हे कृत्य केल्याचं नंतर तपासात निष्पन्न झालं. या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

घटना घडल्याच्या दिवशीच झाली शिक्षा

आरोपी  विकेश नगराळे विवाहित असून त्याला एक मुलगी  आहे. ही घटना घडली तेव्हा नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचे  सांगण्यात आले होते. घटनेच्या तीन महिने आधीही  त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते पण तरीही आरोपी विकेश नगराळेने  पीडितेला त्रास देणे  सुरूच ठेवलं होतं. अखेर याचे  पर्यवसान ३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये झाले. दरम्यान न्यायलायाच्या निकालाने समाधानी असल्याचे मत पीडितेच्या आई- वडिलांनी व्यक्त केले  आहे. तसेच, आज पीडितेचा स्मृतीदिन असल्याने आजच्याच दिवशी आरोपीला शिक्षा ठोठावल्यामुळं पिडीतेच्या आई- वडिलांना भावना अनावर झाल्या होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!