Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LataMangeshkar : रथयात्रेची “सिग्नेचर ट्यून” बनले होते लताजींचे गाणे , गहिवरले लालकृष्ण अडवाणी !!

Spread the love

नवी दिल्ली : आपण काढलेल्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ राम रथ यात्रेदरम्यान लालाजींनी गायिलेले रामाचे भजन रथयात्रेची “सिग्नेचर ट्यून” बनले होते अशी आठवण सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच एक निवेदन जारी करून  त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.


आपल्या या निवेदनात  त्यांनी आपल्या आठवणी  सांगितल्या. अडवाणी यांनी म्हटले आहे कि , “लताजी एक चांगल्या व्यक्ती होत्या आणि मी त्यांच्या साधेपणाने, प्रेमळपणाने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्याशी झालेल्या माझ्या सर्व संवादात आपल्या महान देशावरील प्रेमाने प्रभावित झालो.”

अडवाणी यांनी  1990 मध्ये गुजरातमधील सोमनाथ ते यूपीमधील अयोध्या अशी रथयात्रा काढली होती . या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे कि ,  “लताजी या लोकप्रिय गायकांमध्ये नेहमीच माझ्या आवडत्या राहिल्या आहेत आणि त्यांच्याशी मी दीर्घकाळ जोडलो गेलो आहे याबद्दल मी स्वतःला  भाग्यवान समजतो. लक्षात ठेवा, जेव्हा त्यांनी एक सुंदर श्री राम भजन रेकॉर्ड करून मला पाठवले, तेंव्हा  मी सोमनाथ ते अयोध्येला राम रथयात्रा सुरू करणार होतो … ते अविस्मरणीय गाणे आहे- “राम नाम में जादू ऐसा, राम नाम मन भये, मन”. थेट अयोध्येपर्यंत हे गाणे माझ्या प्रवासाची सिग्नेचर ट्युन बनले.”

त्यांनी लिहिले आहे  की, “लताजींनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी गायलेल्या अगणित सुंदर गाण्यांपैकी  ” ज्योती कलश चहके …” हे गाणे  मला विशेष आवडते … आणि प्रत्येक वेळी लताजींनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये माझ्या विनंतीवरून हे गाणे गायले, याचा मला खूप आनंद वाटत होता.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!