Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LiveUpdate : Lata Mangeshkar Passes away : लता मंगेशकर पंचतत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Spread the love

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा लाईव्ह अपडेट | MahanayakOnline

लताजी पंचतत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लताजींच्या पार्थिवावरील भारताचा राष्ट्रीय ध्वज हा मंगेशकर कुटुंबियांकडे सुपूर्द

लताजींना  तिन्ही दलांकडून मानवंदना, भारताचा राष्ट्रीय ध्वज हा मंगेशकर कुटुंबियांकडे सुपूर्द,

अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण, थोड्याच वेळात अंत्यविधीला सुरुवात

आदिनाथ मंगेशकर ( हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव) लता दिदींना अग्नी देणार

सिनेसृष्टीसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज शिवाजी पार्कवर दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली, पंतप्रधान मोदींकडून मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क मैदानावर दाखल, लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत, पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली

शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल

लताजी यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर दाखल.

सिनेसृष्टीसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली

सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, शंकर महादेवन यांनी पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली, लताजींना  श्रद्धांजली अर्पण करताना सर्वच क्षेत्रातील मान्यवर भावूक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुष्पहार अर्पण करत लताजींना वाहिली श्रद्धांजली, तर सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार यांसह अनेक राजकीय दिग्गजांनी पुष्पचक्र अर्पण करत  श्रद्धांजली वाहिली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही वाहिली श्रद्धांजली, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करत वाहिली श्रद्धांजली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुष्पचक्र अर्पण करत  वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल, काही मिनिटात शिवाजी पार्कमध्ये पोहोचणार

सचिन तेंडुलकर, शाहरुख खानसह अनेक मान्यवर शिवाजी पार्कवर.

लताजींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल

अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण

लताजींच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली असून  ६ वाजण्याच्या दरम्यान अंत्यविधी पार पडतील  आहे. शासकीय मानवंदना आणि त्यांनतर आठ भटजी हा विधी पार पडतील. थोड्याच वेळात होणार शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार. अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची शिवाजी पार्क येथे  मोठी गर्दी झाली आहे. 

पाकिस्तानमधूनही शोक व्यक्त

‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पाकिस्तानमधूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी, विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांच्यासह अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अमिताभ बच्चन यांना भावना अनावर

लता मंगेशकर यांच्या निधनाने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना आपल्या भावना अनावर झाल्या. ‘शतकांचा आवाज’ असे वर्णन करत अमिताभ बच्चन यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. अमिताभ बच्चन लिहितात, ‘वें हमें छोड़ गई, सदियों की आवाज हमें छोड़ कर चली गई. उनकी आवाज स्वर्ग में गूंजती है. सुख और शांती के लिए प्रार्थना.’

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला.” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “आज (रविवार, ६ फेब्रुवारी) भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सुमारे सहा वाजता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचतील, त्यानंतर लता मंगेशकरजी यांचे अंतिम संस्कार संध्याकाळी (6:15-6:30) च्या दरम्यान केले जातील : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल

– लता मंगेशकर यांचे पार्थिव प्रभू कुंज ते शिवाजी पार्क, दादर येथे नेण्यासाठी लष्कराने खुला ट्रक उपलब्ध करून दिला.

– शिवाजी पार्क मैदानावर विशेष स्टेज उभारण्यात येत असून तेथे लताजींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

 

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लतादीदी यांचे निधन

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लतादीदी यांचे निधन


– लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी साडेचारच्या (4.30) दरम्यान मुंबईत येणार आहेत.

MumbaiNewsUpdate : लता मंगेशकर यांच्या अंत्य संस्कारासाठी पंतप्रधान मुंबईत

– लता मंगेशकर यांचे पार्थिव 12.30 वाजता त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. तसेच आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कवर पूर्ण राज्य सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

– लता मंगेशकर यांचा मृत्यू मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे : डॉक्टर

– आदित्य ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले

 


https://twitter.com/iam_juhi/status/1490203895653879808

 

https://twitter.com/TheShilpaShetty/status/1490197514989240321

 

– लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला असून यादरम्यान राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल.

– नितीन गडकरी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले, जिथे लता मंगेशकर गेल्या २९ दिवसांपासून दाखल होत्या.

 

 

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!