Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : विद्यार्थिनींच्या हिजाब विरुद्ध विद्यार्थ्यांच्या भगव्या शालीच्या वादामुळे तणाव

Spread the love

बंगळूरु :  कर्नाटकातील काही मुस्लिम मुलींनी हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी मागितलेली असताना हिंदुत्ववादी विद्यार्थिनी – विद्यार्थ्यांच्या एका गटाने पुन्हा भगवा स्कार्फ परिधान करून त्यांच्या महाविद्यालय गाठल्याने या विषयावरून कर्नाटकातील वातावरण तणावपूर्ण होत असल्याचे वृत्त आहे. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील व्हिडिओमध्ये, मुले आणि मुली कॉलेजच्या गणवेशावर स्कार्फ घालून कॉलेजकडे जाताना “जय श्री राम”चा नारा देताना दिसत आहेत. दरम्यान या विषयावरून  काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर निशाणा साधला आहे. दरम्यान हा प्रकार म्हणजे या मुलींना मूलभूत अधिकार नाकारण्यासारखे आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.


या प्रकरणातील व्हिडिओ क्लिपमध्ये मुस्लिम विद्यार्थिनी  त्यांच्या गणवेशावर स्कार्फ घालून वेगळ्या रांगेत दिसत आहेत. कॉलेजजवळ पोलिसांची गाडीही उभी असलेली दिसते. दरम्यान व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी भगवे कपडे घातलेल्या आंदोलकांच्या गटांना पांगवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.  तत्पूर्वी, कुंदापूरच्या किनारी शहराच्या व्हिडिओमध्ये, सरकारी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी डोक्यावर स्कार्फ घातलेले त्यांचे प्राचार्य रामकृष्ण जीजे यांच्याशी वाद घालताना दिसत होते.

दरम्यान या वादावर आपले ट्विट करताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे कि , “विद्यार्थ्यीनींचे हिजाब त्यांच्या शिक्षणाच्या आड आणून आपण भारतातील मुलींचे भविष्य लुटत आहोत. देवी सरस्वती सर्वांना ज्ञान देते. ती भेद करत नाही.”

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांकडून हिजाबबंदीचे समर्थन

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कॉलेजच्या नियमानुसार विद्यार्थिनींना  वर्गात हिजाब घालण्याची परवानगी आहे. परंतु कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले की विद्यार्थ्यांनी शाळेत “हिजाब किंवा भगवा स्कार्फ घालू नये”. “शाळा ही अशी जागा आहे जिथे सर्व धर्माच्या मुलांनी एकत्र शिकले पाहिजे आणि आपण वेगळे नाही आणि सर्व भारत मातेची मुले आहोत ही भावना आत्मसात केली पाहिजे,” ज्ञानेंद्र यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, “अशा धार्मिक संघटना आहेत ज्यांना अन्यथा वाटते, मी पोलिसांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. जे या देशाच्या एकात्मतेला बाधा आणतात किंवा कमकुवत करतात, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.”

तुमचा हिजाब तर आमच्या भगव्या शाली !!

कर्नाटकातील आणखी दोन महाविद्यालयांमध्ये हिजाबचा वाद चालू असतानाच आता भगव्या शालीचा मुद्दा समोर आला आहे. यातील एक उडपी  जिल्ह्यातील असून दुसरे बेळगावी येथील आहे. हिजाब घातलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींच्या गटाला आणि भगवी शाल घातलेल्या ३०० हिंदू मुलांना उडपीतील  बिंदूर येथील सरकारी पीयू महाविद्यालयामध्ये वर्गात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. हे उडुपी जिल्ह्यातील पाचवे महाविद्यालय आहे ( कुंदापूरमधील तीन, उडुपीमधील एक आणि बिंदूरमधील एक) ज्यामध्ये हिजाब घालण्यावरून वाद झाला आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका

दरम्यान या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही तापण्यास सुरूवात झाल्याजे दिसत आहे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा प्रकार म्हणजे या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका केली आहे. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकरणावर निषेध नोंदवला आहे. एका शासकीय  पीयू कॉलेज फॉर गर्ल्स, उडपी येथून सुरु झालेला हा वाद कर्नाटकातील अनेक महाविद्यालयापर्यंत पसरला आहे. दरम्यान यामध्ये  शिवमोग्गा येथील दोन सरकारी पीयू कॉलेज, कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालय, भांडारकर कला आणि विज्ञान महाविद्यालय (कुंदापूर), सरकारी पीयू कॉलेज, बिंदूर आणि बेलागावी सरकारी पीयू कॉलेजसह अन्य महाविद्यालयांचा समावेश आहे.

शासनाच्या आदेशानंतर मज्जाव

विशेष म्हणजे अकादमी ऑफ जनरल एज्युकेशन, मणिपाल द्वारा प्रायोजित, कुंदापूर येथील दोन्ही शासकीय महाविद्यालय आणि भांडारकर महाविद्यालये जे विद्यार्थीनींना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देत ​​होते, मात्र सरकारने अलीकडेच राज्यातील सर्व सरकारी महाविद्यालयांना तशी परवानगी न देण्याचे आदेश दिल्यानंतर, हिजाब परिधान करून किंवा भगवी शाल घालून येणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशास मनाई करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

हिजाब विरुद्ध भगव्या शालीच्या वादामुळे महाविद्यालयाने दिली सुट्टी

दरम्यान कुंदापूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी शासकीय कनिष्ठ महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तथापि, विद्यार्थीनी प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाल्या आणि त्यांनी वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जावी, असा आग्रह धरला. त्यानंतर महाविद्यालयाच्या निर्णयाचा निषेध करत विद्यार्थी आणि पालकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने देखील केली. हा प्रकार चालू असतानाच , सुमारे १०० हिंदू मुलांनी भगव्या शाल आणल्या, त्यामुळे कॅम्पसमध्ये तणाव निर्माण झाला होता. प्राचार्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याचे आदेश दिल्याने महाविद्यालयाने शनिवारची सुट्टी जाहीर केली.

पालकांनाही दिली हिजाबबंदीची माहिती

दुसरीकडे मुस्लीम मुलींना डोक्यावर स्कार्फ घालून प्रवेश नाकारण्यात आल्याने शुक्रवारी भांडारकर कॉलेजसमोर ठिय्या आंदोलन झाले. त्यांनी कॉलेजच्या गेटसमोर रस्त्यावर बसून हिजाब घालण्याचा आपला हक्क असल्याचे सांगत घोषणाबाजी केली. यानंतर कुंदापूरचे आमदार हल्दी श्रीनिवास शेट्टी यांनी मुस्लीम मुलींच्या पालकांची बैठक बोलावली. यामध्ये, अर्ज प्रक्रियेदरम्यान जर महाविद्यालयाने हिजाब बंदीची माहिती दिली असती तर आम्ही वेगळी संस्था निवडली असती, असे पालकांकडून सांगितले गेले.दरम्यान, हिजाबचा वाद सुरू झालेल्या उडुपी येथील गव्हर्नमेंट पीयू कॉलेज फॉर गर्ल्समधील सहा विद्यार्थिनींनी कॅम्पसबाहेर आंदोलन सुरूच ठेवल्याचे दिसून आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!