Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

InformationUpdate : शालेय विद्यार्थ्यांसाठी “ऑनलाईन लाईव्ह” ज्ञान महोत्सवाचे आयोजन

Spread the love

राज्य मंडळाच्या इयत्ता बारावी इंग्लिश विषयाच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा


महाराष्ट्र राज्य मंडळाची इयत्ता बारावीची मार्च 2022, परिक्षा केंद्रस्थानी मानून “ऑनलाइन लाईव्ह ज्ञान महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सेक्शनवर आणि प्रत्येक प्रश्नावर महाराष्ट्र राज्यातील तज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.


सहा दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत प्रा. अनिल बगाडे (पी डी लायंस ज्युनियर कॉलेज, मालाड, मुंबई) – प्रोज सेक्शन, प्रा. प्रभा सोनी (गव्हर्नमेंट कॉलेज, औरंगाबाद) – पोएट्री सेक्शन, प्रा. नदीम खान (नूतन कन्या ज्युनियर कॉलेज, भंडारा) – रायटिंग स्किल्स, प्रा. तुषार चव्हाण (राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज, चाळीसगाव) – रायटिंग स्किल्स, प्रा. सुजाता अली (धर्मपेठ सायन्स कॉलेज, नागपूर) – रायटिंग स्किल्स, डॉ. सुहासिनी जाधव (एचपीटी ज्युनियर कॉलेज, नाशिक) – नोव्हेल सेक्शन, प्रा. अविनाश रडे, (एल.बी. शास्त्री जुनियर कॉलेज, पालघर) – कृतीपत्रिका सोडविताना काय करावे व काय करू नये, या विषयावर परीक्षा केंद्री मार्गदर्शन करणार आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांना शैक्षणिक जीवनात अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या अशा या ऑनलाईन लाईव्ह ज्ञान महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण (इंग्लिश तज्ञत्व) औरंगाबाद, संचालक, डॉ. कलिमुद्दिन शेख हे करणार असून समारोप एससीईआरटी, पुणे, उपसंचालक, श्री विकास गरड हे करणार आहेत. झेडपी लाईव्ह एज्युकेशनचा टेक्निकल सपोर्ट लाभलेला हा शैक्षणिक कार्यक्रम 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दररोज संध्याकाळी 6:30 ते 8:00 वाजेपर्यंत “Dr Sanjay Gaikwad” या यूट्यूब चैनलवर लाइव्ह पाहता येणार आहे.

या कार्यक्रमाचा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन आयोजक प्रा. संजू परदेशी (एएफएसी कॉलेज, चेंबूर, मुंबई), डॉ. संजय गायकवाड (म जो फुले ज्युनियर कॉलेज,औरंगाबाद) श्री. गजेंद्र बोंबले (जिल्हा परिषद, औरंगाबाद) डॉ. आशिष देऊरकर (मुंगसाजी कॉलेज, माणिकडोह, यवतमाळ), डॉ. राजेंद्र बेडवाल (नागेश्वर विद्यालय, नागापूर, औरंगाबाद) यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!