Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : चुकीला माफी नाही , न्यायालयाने ‘तारक मेहता…’ फेम बबिताच्या माफीनाम्यासह जामीन अर्जही फेटाळला …

Spread the love

मुंबई : चुकीला माफी नाही असा पवित्रा घेत जातीवाचक टिप्पणी केल्याबद्दल  माफीनामा सादर केल्यानंतरही हिसारच्या विशेष न्यायालयाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री बबिता म्हणजेच  मुनमुन दत्ताचा जामीन अर्ज फेटाळू लावला आहे. त्यामुळे मुनमुन दत्ताच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.


टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील ‘बबीता जी’ म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता आता पुन्हा एकदा या निमित्ताने चर्चेत आली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे मुनमुनला लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुनमुन तिच्या एका वादग्रस्त व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. या व्हिडिओ जातीवाचक टिप्पणी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यानच्या काळात  आपल्या वादग्रस्त विधानामुळे परिस्थिती चिघळत असल्याचे  लक्षात आल्यानंतर मुनमुन हिने  घडलेल्या प्रकाराबाबत सर्वांची माफी देखील मागितली. तिने त्याबाबत  एक अधिकृत पत्रक जारी करुन आपण व्हिडिओ उल्लेख केलेल्या शब्दाचा खरा अर्थ माहित नव्हता असे स्पष्टीकरणही दिले परंतु न्यायालयाने चुकीला माफी दिली नाही.

त्याचे असे झाले होते …

विषय असा आहे  कि , मुनमुन दत्ताचे  एक यूट्यूब चॅनल  आहे. या चॅनलवर ती व्हिडिओच्या माध्यमातून विविध विषयांवर बोलत असते. मुनमुन दत्ता हिने  गेल्या वर्षी तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात तिने काही वादग्रस्त आणि जातीवाचक  वक्तव्य केली होती. त्यावरून मुनमुन दत्त हिने  जाणूनबुजून अनुसूचित जाती समाजाला लक्ष्य केल्याची टीका तिच्यावर करण्यात आली. तिच्या विरोधात ट्विटरवरून #ArrestMunmunDutta अशा हॅशटॅगचा  ट्रेंडही चालवण्यात आला  केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!