Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : नथुराम खरा हिंदुत्ववादी आणि देशभक्त असता तर त्याने गांधींवर नव्हे जिनावर गोळी झाडली असती : खा. संजय राऊत

Spread the love

मुंबई : नथुराम गोडसे खरा राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी  होता तर त्याने निशस्त्र गांधींवर गोळीवर का झाडली ? पाकिस्तानची मागणी करणाऱ्या जिनावर गोळी का झाडली नाही ? असा प्रश्न शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे आणि हिंदुत्त्ववादवर बोलताना उपस्थित केला आहे.


पाकिस्तानची मागणी तर जिन्ना यांनी केली होती. त्यामुळे जर कुणी खरा हिंदुत्ववादी असता तर त्यानं गांधींना नव्हे, जिन्ना यांना गोळी घातली असती, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले कि , “जर कुणी खरा हिंदुत्ववादी असता तर त्यानं जिन्नांना गोळी घातली असती. गांधींना का मारलं?. जिन्नांनी पाकिस्तानची मागणी केली होती. ज्यांनी देशाचं विभाजन केलं आणि पाकिस्तानची मागणी केली म्हणजेच जिन्ना यांना गोळी घातली पाहिजे होती. जर तुमच्यात हिंमत होती तर जिन्ना यांना गोळी घातली असती. ते एक देशभक्तीपर कृत्य ठरलं असतं. एका फकिराला गोळी घालणं ठिक नव्हतं. त्यांच्यावरील हल्ल्याचा आज जगभरात निषेध होतो. त्याचं दु:ख आज संपूर्ण जगाला आहे”.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘हिंदुत्ववादी’ शब्दाचा वापर करून महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि ,  “एका हिंदुत्ववाद्याने  महात्मा गांधी यांना गोळी घातली होती. आज सर्व हिंदुत्ववाद्यांना वाटतं की गांधीजी राहिले नाहीत. पण जिथं सत्य आहे तिथं आजही बापू जिवंत आहेत. याच ट्विटबाबत संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हा थेट प्रश्न केला.  …तर जिनांवर गोळी का झाडली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!