Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : हातात संविधानाची प्रत घेऊन , १०० पोलिसांच्या बंदोबस्तात निघाली ‘त्याच्या’ लग्नाची वरात…!!

Spread the love

नीमच : मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील एका गावात एका मागास  तरुणाला पोलीस बंदोबस्तात आपल्या लग्नाची वरात  काढावी लागली. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मनसा पोलिस स्टेशन हद्दीतील सरसी गावात गावातील काही गुंडांनी मागास वराला घोड्यावर चढून वरात न काढण्याची धमकी दिली होती त्यामुळे  तक्रार मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी गावात पोहोचून डीजे च्या निणादात थाटामाटात या दलित वराची मिरवणूक काढली. प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली.


विशेष म्हणजे हि वरात  काढण्यापूर्वी सुमारे १०० पोलिसांनी गावात फ्लॅग मार्च केला, त्यानंतर मिरवणुकीला सुरक्षा देऊन गावातून वरात काढली. पोलीस बंदोबस्तामुळे लोकांनीही या वरातीत बिनधास्त नाचण्याचा आनंद घेतला. यावेळी वराने घोडीवर बस्तान  हातात संविधानाची प्रत घेतली होती.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , मध्य प्रदेशातल्या मानसापासून तीन किमी अंतरावर असलेल्या सरसी गावातील फकीरचंद मेघवाल यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा राहुलच्या लग्नात गोंधळ निर्माण केला जाणार असून  गावातील कथित सवर्ण गुंडांकडून  तशा धमक्या देण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मागासवर्गीय  कुटुंबाला सुरक्षा देण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते.

दरम्यान गुरुवारी राहुलची बिंदोली (वरात ) निघाली तेव्हा तीन पोलीस ठाण्याचे पोलीस संपूर्ण गावात बंदोबस्तासाठी हजर होते. तत्पूर्वी वरच्या वरती आधी पोलीस दलाने  गावातून फ्लॅग मार्च काढला. यानंतर पोलिस अधिकारी आणि जवानांच्या उपस्थितीत हि वरात निघाली. यावेळी तहसीलदार, एसडीओपी, एसडीएम यांच्यासह सर्व अधिकारी गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जातीने उपस्थित होते.

या घटनेबाबत बोलताना मागासवर्गीय  वर राहुल मेघवाल यांनी सांगितले की, गुंडांनी त्याच्या कुटुंबीयांना धमकी दिली होती की, जर घोडीवरून मिरवणूक काढली तर एका वर्षात गाव सोडावे लागेल. यानंतर त्याच्या वडिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

मनसा पोलीस ठाण्याचे प्रभारी के.एल.डांगी यांनी सांगितले की, बिंदोली  (नवरदेवाची वरात ) काढताना दंगल  होण्याची शक्यता दलित कुटुंबाकडून वर्तवली जात होती, त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाकडून सर्व बंदोबस्त करण्यात आला आणि बिंदोली शांततेत काढण्यात आली. यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर गावात कुठलाही तणाव नसून  शांतता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!