Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

FinancialNewsUpdate : आयटी रिटर्न भरले नसेल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे…

Spread the love

मुंबई : आयकर विभागाने  2021-22 साठी आयकर रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 होती. परंतु आता प्राप्तिकर विभाग  काही दंड आणि विलंब शुल्कासह 31 मार्च 2022 पर्यंत रिटर्न भरण्याची सुविधा दिली आहे. मात्र या देय तारखेपर्यंत रिटर्न भरले नाही तर सरकार तुमच्यावर खटला भरून तुमच्याकडून दंड वसूल करू शकते.

ज्या आयकर दात्यांनी 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरलेले नाही असे करदाते त्यांच्या कर स्लॅबनुसार दंड भरून आयटीआर पूर्ण करू शकतात. दरम्यान घोषित तारखेप्रमाणे आयटीआर 31 मार्चपर्यंत भरला नाही तर कर भरावा लागल्यानंतर कमीत कमी 3 वर्षे आणि कमाल 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. अशा करदात्यांकडून, आयकर विभाग थकित कर आणि व्याज व्यतिरिक्त 50 ते 200 टक्के दंड देखील लावू शकतो. याशिवाय सरकारची इच्छा असेल तर ते करदात्यावर खटलाही चालवू शकतात.

दरम्यान प्राप्तिकर नियमांनुसार, आयटीआर दाखल करण्यात अपयशी ठरणाऱ्या प्रत्येक करदात्यावर सरकारी कारवाई होणार नाही मात्र जेव्हा करदात्याचे  दायित्व 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हाच आयकर विभाग खटल्यांची कार्यवाही सुरू करतो. जर करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर करदात्याला 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. मात्र जर करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर दंडाची रक्कम 1000 रुपये असेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!