Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ज्येष्ठ साहित्यिक , पत्रकार अनिल अवचट यांचे निधन

Spread the love

पुणे  : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.  उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते. मात्र नंतर त्यांना घरी आणण्यात आले  होते . पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचलं.

अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत. १९६९ साली त्यांचे  पूर्णिया हे प्रसिद्ध झाले . तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. आतापर्यंत त्यांची ३८ हून अधिक पुस्तके  प्रकाशित झाली आहेत. परंतु केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी  मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात त्यांनी केली. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते . त्यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची एक अनोखी पद्धत शोधली होती. जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांची ही पद्धत वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो.

डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!