Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अरे रे !! हे काय ? पद्म पुरस्कार जाहीर झाल्याच्या दिवशीच ‘या’ व्यक्तीविरुद्ध मुंबई पोलिसात झाला गुन्हा दाखल !!

Spread the love

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर पश्चिम बंगालमधील तिघांनी पुरस्कार नाकरल्याची बातमी येत नाही तोच याच यादीत असणारे गुगलचे पहिले भारतीय सीईओ सुंदर पिचाई यांच्या विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने हा पुरस्कारही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


पिचाई यांना त्यांचे व्यापार आणि उद्योग या श्रेणीतील उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे. मात्र आता पिचई यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी सुंदर पिचई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बॉलिवूडमधील निर्माते दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या तक्रारीवरून मुंबईत गुगलचे सीईओ पिचाई आणि गुगलच्या सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/148629503265539686?

काय आहे प्रकरण ?

दिनांक २५ जानेवारी रोजी कॉपीराइट उल्लंघन प्रकरणी ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. याबाबत तक्रारदार सुनील दर्शन यांनी सांगितले की, यूट्यूब आपल्या चित्रपट आणि संगीताच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे आणि त्यासाठी ते ११ वर्षांपासून संघर्ष करत आहेत. निर्माता-दिग्दर्शक म्हणून सुनील दर्शन यांचा शेवटचा चित्रपट ‘एक हसीना थी एक दीवाना था’ हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला होता. गुगलने अनधिकृत व्यक्तींना त्यांचा चित्रपट ‘एक हसीना थी एक दीवाना था’ यूट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे गुगल कंपनीच्या या कृत्याविरुद्ध पोलिसात तक्रार देऊनही त्याची दखल न घेतल्यामुळे न्यायालयात धाव घेतल्यानंतर अखेर न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि कंपनीच्या इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर झाला गुन्हा दाखल

दरम्यान गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह सहा जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याबाबत सुनील दर्शन यांनी याबाबत भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे कि , “मी गेल्या ११ वर्षांपासून हे युद्ध लढत होतो. मी सरकारकडून गुगल आणि यूट्यूबच्या बड्या अधिकाऱ्यांना अनेक पत्रे, विनंत्या लिहिल्या, पण कोणी ऐकले नाही. कोणीही उत्तर द्यायला तयार नव्हते. विशेष म्हणजे माझी तक्रार नोंदवायलाही कोणी तयार नव्हते. त्यानंतर मी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि कोर्टाच्या आदेशानंतरच मी गुन्हा दाखल करू शकलो. ”

कोण आहेत सुंदर पिचाई

तामिळनाडूमध्ये जन्मलेले सुंदर पिचाई २०१५ साली जगातील गुगलचे सीईओ बनले. ते भारतीय वंशाचे पहिले नागरिक होते ज्यांना गुगल मध्ये सर्वात मोठी जबाबदारी मिळाली. गुगलचे सह-संस्थापक लॉरी यांनी सुंदर पिचाई यांना गुगलचे सीईओ म्हणून घोषित केले आणि अशी प्रतिभावान व्यक्ती आपल्यामध्ये असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे म्हटले होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले सुंदर पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिक इंजिनियर होते पण आर्थिक दुर्बलतेमुळे ते त्यांना चांगले शिक्षण देऊ शकले नाहीत. सुंदर पिचाई यांनी १९९३ मध्ये आयआयटी खडगपूरमधून बीटेक केले. यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस आणि व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले. व्हार्टन स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना दोन शिष्यवृत्ती मिळाल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!