Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : वर्धा जिल्ह्यात भीषण अपघात , आमदार पुत्रासह ७ विद्यार्थी जागीच ठार

Spread the love

वर्धा : जिल्ह्यातील सेलसुरा येथे एका कार्ल एक भीषण अपघात होऊन त्यात ७ तरुणांचा  जागीच मृत्यू झाला आहे. हे तरुण  देवळी येथून वर्ध्याला जात होती. मात्र, यादरम्यानच सेलसुरा येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलले आणि कार नदीच्या पुलावरुन  खाली कोसळली. या अपघातात तिरोडा – गोरेगावच्या आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा मुलगा  अविष्कार रहांगडाले याचाही  मृत्यू झाला आहे.

नीरज चव्हाण, अविष्कार रहांगडाले, नितेश सिंह, विवेक नंदन, प्रत्युष सिंह, शुभम जैसवाल, पवन शक्ती, अशी अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे  आहेत.

या दुर्घटनेत मरण पावलेले सर्व  तरुण सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की नदीवरुन पुल तोडून हि कार ४० फूट पुलावरून खाली पडली. सर्व मृतक विद्यार्थी हे २५ ते ३५ वयोगटातील आहेत. रात्री एक वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचं काम चालू होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!