Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NewsInTrending : कळीचा मुद्दा : खा. अमोल कोल्हे यांचा “नथुराम ” आणि खा. शरद पवार यांची भूमिका…

Spread the love

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे याची भूमिका केलेला चित्रपट  ‘व्हाय आय किल्ड गांधी’ ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियामध्ये येताच खा. कोल्हे यांच्या भूमिकेबाबत उलट -सुलट चर्चा होताना दिसत आहे. याबाबत खा . कोल्हे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून आपली भूमिकाही मंडळी परंतु ते वादाचा विषय झालेले असताना राष्ट्रवादीचे प्रमुख  शरद पवार यांनी त्यांच्या पदाला शोभेल अशीच प्रतिक्रिया देत खा. अमोल कोल्हे यांची नव्हे तर कलाकार अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. याबाबदल सर्वांच्याच भुवया उंचावल्या मात्र त्यांचेच नाव शरद पवार आई हे यातून पुन्हा सिद्ध व्हावे  अशीच पवार यांची या विषयावरील प्रतिक्रिया आहे असेच म्हणावे लागेल.


खरे तर नथुराम गोडसे आणि गांधी हा विषय तसा नवीन नाही. गोडसे याने गांधींना का मारले ? याविषयी त्यांच्या बंधूंचे पुस्तक आधीपासूनच प्रसिद्ध आहे. अनेकांनी ते वाचलेही आहे त्यात विशेष असे काहीही नाही आणि नव्हते. निशस्त्र गांधींचा त्यांना ‘राम राम..’ करून खून करणारा नथुराम काही लोकांमध्ये नव्हे तर काही प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आधीपासूनच प्रिय आहेच त्यातही नवल नाही परंतु एक विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी गांधींच्या या हत्येला ” गांधी वध ” असे त्यांच्या परंपरेतले नाव देऊन या विषयाचे आधीच उदात्तीकरण केलेले आहेच त्याचेही नवल नाही परंतु अलीकडच्या काळात नथुरामच्या प्रेमींनी उचल खालली आहे आणि उघडपणे नथुरामचा त्यांच्याकडून राजरोसपणे उदोउदो चालू आहे नवल याचे वाटते. अर्थात ज्या देशात अनेक कुप्रथा आणि चालीरीतींचे उघडपणे समर्थन केले जात आहे त्या देशात काही लोकांच्या ओठात राम असला तरी पोटात नथुराम आहे हेच या निमित्ताने अधोरेखित होत आहे.

आलेल्या प्रतिक्रिया त्यांच्या जबाबदारीला साजेशाच…

यावर आधी नाटक आले अनेक नेत्यांनी नथुरामचा जयघोष केला एका बाईने तर चक्क गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या चालवून पुन्हा एकदा गांधींचा खून केला. या सगळ्यावर कडी म्हणजे भाजपच्याच एका महिला खासदाराने उघड उघड नथुरामचे समर्थन केले तेंव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या खासदार महिलेच्या वक्तव्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून पंतप्रधान पदाला साजेसे वर्तन केले. त्यामुळे देशाचे जबाबदार नेते म्हटले कि मग ते मोदी असोत कि , पवार त्यांची अशा संवेदनशील विषयावरील प्रतिक्रियाही तशीच असते . आणि इतर लोकांच्या प्रतिक्रियाही त्यांच्या उत्तराला साजेशाच आहेत.

भाजपची प्रतिक्रिया अशी आहे…

या प्रकरणावर भाजपने आपली प्रतिक्रिया देताना , यामध्ये काही चुकीचे नसल्याचे  म्हटले  आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे कि, “एक अभिनेता म्हणून त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका करणे  यात मला काही चुकीचे  वाटत नाही. ते नथुराम गोडसेच्या विचाराच्या बाबतीत समंत आहेत का ? हे त्यांनी एकदा जाहीर करावे ती विरोधाची भूमिका मावळली का हा मुद्दा आहे. अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो. नथुराम गोडसेची करु शकतो…अफझल खानाचीही करु शकतो. त्याला काय होतं. म्हणजे मला नथुराम गोडसे अफझल खान आहे असे  म्हणायचे  नाही. सध्या संवदेनशील वातावरण असल्याने कशावरुनही वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे अफझल खान बाजूला ठेवू. पण एक अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो”.

काय आहे वादाचा मुद्दा ?

कळीचा मुद्दा असा आहे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २०१७ मध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं होते . पण दिग्दर्शक आणि निर्मात्यांमधील वादामुळे हा चित्रपट रखडला होता. पण त्यांच्यातील वाद समन्वयाने मिटल्यामुळे हा चित्रपट आता पाच वर्षांनी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात त्यावेळी अभिनेता असणारे अमोल कोल्हे शिवसेनेत होते आणि  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. पण २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. २०१९ लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

खा. अमोल कोल्हे यांचे म्हणणे असे आहे…

आता विषय असा आहे कि , राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी नेहमीच नथुराम गोडसेला विरोध करत आली आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका करणे  हे पक्षाच्या विचारसरणीविरोधात आहे. एकाप्रकारे हे नथुराम गोडसेचे  उदात्तीकरण असल्याची चर्चा यातून होते आहे. त्यामुळेच अभिनेता आणि सोबतच खासदार असलेल्या अमोल कोल्हेंच्या या चित्रपटावर चर्चेच्या फैरी झाडात आहेत. अर्थात ज्यावेळी आपण हा चित्रपट केला तेंव्हा आपण राजकारणात सक्रिय नव्हतो असेही कोल्हे यांचे म्हणणे आहे .

कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार, एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत.

तुषार गांधी यांचीही प्रतिक्रिया…

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीही या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे कि ,  “अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली ती अभिनेता म्हणून केली आहे . त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. मी तर असे  म्हणेन की त्यांना नथुराम आवडत असेल, तो त्यांचा आदर्श असेल तर तेही त्यांना स्वातंत्र्य आहे. जसा मला बापूंना मानायचे , भक्ती करायचे  स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कलावंत म्हणून अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली त्याला माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र, एका खुन्याचे  उदात्तीकरण करण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याचा निषेध करायला हवा. तो आमचा अधिकार आहे.”

नथुरामच्या उदात्तीकरणामुळे काहीही फरक पडणार नाही…

“आपल्या संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्याला कितीही न आवडणारे  मत असले  तरी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपूनच ठेवावे लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा मी समर्थक नाही. नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाच्या या प्रयत्नांची मला भीती वाटत नाही, कारण याने बापूंचे  काही नुकसान होईल असे  वाटत नाही. बापूंना बदनाम करण्याचे आणि नथुरामचे  उदात्तीकरण करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ७० वर्षांनंतरही बापूंच्या कामाचे  महत्त्व कायम आहे हे आपण पाहत आहोत. त्यांना शेवटी नथुराम हत्यारा होता हे मान्यच करावे  लागते . जसा मशिनरी सोल्जर असतो, तो पैसे मिळतात म्हणून जाऊन लढतो, तसेच हे मशिनरी अॅक्टर आहेत. त्यांनी गोडसेचं उदात्तीकरण सुरू केले  तर मग ते त्यांच्या पक्षाचे  मत आहे की स्वतःचे हे विचारावे  लागेल.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आक्षेप

दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी अमोल कोल्हेंच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. “अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,” अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त करताना पुढे म्हटले आहे कि , विनय आपटे, शरद पोंक्षे यांनाही त्यांच्या या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने प्रचंड विरोध केला त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार आहे.

“कलाकार आणि माणूस दोन वेगळ्या भूमिका नाहीत. पण जेव्हा गांधी साकारता भूमिका बदलत नाही कारण ती वैचारिक भूमिका आहे. नथुराम महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. कलाकार म्हणून अमोल कोल्हे महान आहेत, पण त्यांनी केलेल्या अभियानाचा विरोध आहे,” असे ही आव्हाड यांनी म्हटले आहे.

खा. शरद पवार यांच्याकडून मात्र अमोल कोल्हे यांची आपल्या खास शैलीत पाठराखण

या सर्व पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादीचे प्रमुख खा. शरद पवार यांनी म्हटले आहे कि , “महात्मा गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल,” असं शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना पवार असेही म्हणाले कि ,  “छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. कलावंत म्हणून तो भूमिका घेतो. किंवा रामराज्यासंबंधी सिनेमा असेल तर त्यात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल तर तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही. एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिले  पाहिजे. एखाद्याने भूमिका म्हणून म्हणजे सीतेचे  अपहरण केले  याचा अर्थ प्रत्यक्ष सीतेचे  अपहरण त्या कलाकारने केले  असा होत नाही. रावणाचा इतिहास त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे अमोल कोल्हेंनी यासंबंधीची भूमिका घेतली असेल तर ती कलावंत म्हणून आहे”.

त्यांनी जेंव्हा हि भूमिका केली तेंव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते…

यावर पुढे बोलताना पवार म्हणाले कि , अमोल कोल्हेंनी २०१७ मध्ये ही भूमिका केली तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते. हा सिनेमा अजून बाहेरही आलेला नाही. पण कलावंत म्हणून त्यांनी ती भूमिका केली असेल तर याचा अर्थ गांधींजींच्या विरोधात काहीतरी आहे असा नाही. नथुराम गोडसेने जे काम केले  आहे त्यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ, नाराज, दु:खी आहे. त्या नथुरामचे  महत्व वाढवण्याचा यात कोणताही हेतू नाही. याकडे एक कलावंत म्हणून आणि या देशात घडलेला इतिहास समोर ठेवून पहायला पाहिजे.

भाजपालाही  घेतले आडव्या हाताने…

या निमित्ताने त्यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका करण्याचीही संधी सोडली नाही . या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकेवर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि , “भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले. भाजपा आणि आरएसएसच्या इतिहासावर मी भाष्य करु इच्छित नाही. पण एक काळ असा होता की गांधींच्या संबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या कुठे आहेत ते बघितले  पाहिजे. त्यानंतर त्यांनी बोलावे ”. आव्हाडांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आले  असता त्यांनी त्यांचे  मत मांडले  असे म्हणाले. तसेच मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो असेही ते म्हणाले.

जयंत पाटील खा. अमोल कोल्हे यांच्या पाठीशी

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना खा. अमोल कोल्हे यांची एक कलाकार म्हणून पाठराखण केली आहे . यावर बोलताना ते म्हणाले कि , “छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जीवनपट आणि त्यांचे कर्तृत्व घराघऱात पोहोचवण्याचे  कामही अमोल कोल्हे यांनीच केले  आहे. शेवटी कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका पार पाडली आहे. २०१९ मध्ये आम्ही त्यांना पक्षात घेतले  आणि लोकसभेला उभे  केले . लोकांनीदेखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडून आणले . लोकसभेतही ते अतिशय चांगले  काम करत आहेत. बैलगाड्या शर्यत तसंच अनेक मुद्द्यांवर त्यांनी शाहू, फुले, आंबेडकरांचेच विचार सभागृहात मांडले आहेत. त्यामुळे एक कलाकार म्हणून त्यांनी आधी काही भूमिका केली असेल तर आज त्यासंबंधी दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!