Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GoaElectionUpdate : पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणून पर्रीकर पुत्राने घेतला हा निर्णय !!

Spread the love

पणजी  : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी  आपण पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. या निमित्ताने बोलताना त्यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपने केलेल्या खुलाशाचे उत्तरही दिले. मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उमेदवारी देता येणार नाही,  खुलासा गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.


भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उत्पल पर्रीकर विधानसभेत उतरण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विशद केली. ते म्हणाले कि , “मी दुसरे पर्याय कसे मान्य करु शकतो? मी मनोहर पर्रीकरांचा चिरंजीव म्हणून तिकीट मागणार असतो तर मी गेल्यावेळी देखील मागितले  असते . तेव्हा पक्षाने जे सांगितले  ते मी ऐकले . जो उमेदवार त्यांनी दिला आहे  त्याबद्दल मला बोलायला देखील लाज वाटत आहे. आम्ही जिथे ३० वर्ष पक्ष मोठा केला आहे  त्या पणजीत दोन वर्षांपूर्वी दुसरीकडून आलेल्याला व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली याचे  वाईट वाटत आहे. मला काही एक पर्याय राहिलेला नाही. मला आता निर्णय लोकांकडे ठेवायचा आहे. ज्या लोकांनी माझ्या वडिलांना पक्ष वाढवण्यासाठी मदत केली ते माझ्यासोबत आहेत”.

ते पुढे म्हणाले कि , “माझ्या राजकीय कारकिर्दीबद्दल खूप जणांनी चिंता व्यक्त केली आहे. माझ्या राजकीय भवितव्याची चर्चा कुणी करु नका. त्याची चिंता गोव्याची जनता करणार. मी पणजीतून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझे वडील मनोहर पर्रिकरांचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मी भाजपविरोधात नाही. पण तत्त्वांसाठी माझी ही लढाई आहे. जेव्हा माझे वडील सक्रिय होते तेव्हा मी कधीच दिसलो नसेल. आता मला जे माझ्याबरोबर आहेत त्यांच्यासाठी उभे राहायचे आहे.

कुठल्याही पक्षाची ऑफर स्वीकारणार नाही

दरम्यान उत्पल पर्रीकर यांना शिवसेना आणि आपच्या ऑफरबद्दल विचारलं तेव्हा आपण कोणत्याही पक्षाची ऑफर स्वीकारणार नाही असे सांगून ते म्हणाले कि , “मी माझ्याच पक्षाची ऑफर घेत नाही तर दुसऱ्या पक्षाच्या ऑफरचा विचारच होऊ शकत नाही. ते माझ्या मनातच येणार नाही. दुसऱ्या पक्षाचा विचार माझ्या डोक्यात येऊच शकणार नाही”, असेही  उत्पल यांनी स्पष्ट केले.  मी माझ्या पक्षाकडून  मला काहीतरी हवंय म्हणून हे करत नाही. त्यांनी मला पर्याय सांगितले. मला लोकांना पर्याय द्यायचे आहेत. माझा विचार गोव्याच्या नागरिकांसाठी आहे. त्यांना पणजीतून जिथे माझा लोकांशी, कार्यकर्त्यांसोबत संबंध आहे, त्यांना ऑप्शन द्यायचे  आहे. त्यांनी जर मला रिजेक्ट केलं तर मी मान्य करेन. मी अपक्ष लढत असलो तरी माझ्या मनात भाजप रोज असणार. मी आगामी परिस्थितीला सामोरे  जायला तयार आहे”, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!