Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद मध्ये खुनाची मालिका सुरूच ; डोक्यात दगड घालून केली हत्या, मग जाळले गुप्तांग

Spread the love

औरंगाबाद – शहरातील टी. सेंटर भागात ( दि. २१ शुक्रवार ) निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. अशी माहिती पोलिसउपायुक्त दिपक गिर्‍हे यांनी दिली. खुनाचा छडा लावण्यासाठी गुन्हेशाखेचे दोन तर सिडको पोलिसांचे दोन पथके तपास करंत आहेत.

रंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या मैदानात ही हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचे गुप्तांग जाळल्याचंही उघड झाले आहे. शहरातील टी व्ही सेंटर चौकातील ग्राउंडवर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त उज्वला वानकर, पोलिस निरीक्षक विनोद सलगरकर, अविनाश आघाव,एपीआय श्रध्दा वायदंडे, पीएसआय कल्याण शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे.तो सिडकोतील दंडे हाॅस्पिटलमधे सफाई कामगार म्हणून काम करंत होता. त्याचे वय सुमारे 32 वर्षे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी एक पेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाची हत्या होऊन २४ तासांपेक्षाही अधिक काळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच दारू पिण्यावरुन वाद झाल्यानंतर ही हत्या केली असावी असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हेंच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलिस व गुन्हेशाखा करंत आहे.


MahanayakOnline | CrimeUpdate

• AurangabadCrimeUpdate : सिडको पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या टी.व्ही. सेंटर स्टेडियम परिसरात खून

Like| Share | Subscribe

https://youtu.be/8cG3m4H9nns

आपलं सरकार

Click to listen highlighted text!