Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GoaElectionUpdate : भाजपची गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Spread the love

भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. १४ फेब्रुवारीला गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान होणार असून १० मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर हे मडगावमधून निवडणूक लढणार आहेत.

 

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकरांना पणजीमधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तिथून विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण उत्पल पर्रिकरांना भाजने अन्य दोन जागांचा पर्याय दिला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पर्रीकर यांचे कुटुंब हेच आमचे कुटुंब आहे. आम्ही उत्पल पर्रीकर यांना पणजी वगळता दोन जागांचा पर्याय दिला होता. त्यांनी जागा नाकारली होती. दुसऱ्या जागेची चर्चा सुरू आहे. ते त्या जागेवरून निवडणूक लढवण्यास तयार होतील, अशी आम्हाला आशा आहे, असे फडणवीस म्हणाले. उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून प्रचारही सुरू केला होता आणि घरोघरी जाऊन ते मतदारांना भेटत होते. भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे संकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आम्ही गोव्यातील तीन सर्वसाधारण जागांवर एसटीचे उमेदवार उभे केले आहेत, तर एका सर्वसाधारण जागेवर एससी उमेदवार उभे केले आहे. १२ ओबीसी उमेदवार आहेत, ९ अल्पसंख्याक (ख्रिश्चन) उमेदवार आहेत, असे भाजप नेते अरुण सिंह म्हणाले.

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गेल्या 10 वर्षांमध्ये गोव्यात भाजपने स्थिर सरकार आणि विकासाचा मुलमंत्र प्रत्यक्षात उतरवला आहे. गोव्याच्या राजकारणात जी अस्थिरता होती, ती भाजपने संपवली होती. तसेच, भाजपने गोव्याला विकासाच्या नव्या मार्गावर आणले. पुन्हा एकदा लूट करण्यासाठीच काँग्रेसला गोव्यात पुन्हा सत्ता प्रस्तापित करायची आहे. काँग्रेसमधून अनेक मोठ्या नेत्यांनी अलविदा केलं आहे. आता तिथे टीएमसीही आली आहे. मनोहर पर्रीकर यांच्यापासून ते विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापर्यंत भाजपने गोव्यात आतापर्यंत जनतेमध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. एकीकडे जिथे भाजप गोव्याच्या विकासासाठी संघर्ष करतेय. तिथे दुसरीकडे इतर पक्ष केवळ भाजपसोबत संघर्ष करत आहे. टीएमसी गोव्यामध्ये यंदा निवडणूक लढवणार आहे. त्यांना सूटकेसच्या माध्यमातून पक्ष वाढवायचा आहे. टीएमसीची भूमिका हिंदूविरोधी आणि राष्ट्रवादविरोधी आहे.” असा घणाघात भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!