Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SolapurSTStrike : एसटी संपतील कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या

Spread the love

एसटी संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. एसटी महामंडळात २२ वर्षांपासून चालक असलले तुकाराम माळी आंदोलनात सहभागी असल्याने त्यांना घर चालवणे व अन्य खर्च भागवणे शक्य झाले नाही हि खंत त्यांच्या २० वर्षीय मुलगा अमर माळी याच्या मनात होती, यामुळे त्यांनी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली. हा दुर्दैवी प्रकार बुधवारी सोलापूरच्या कोंडी गावात घडला आहे. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

अमर तुकाराम माळी (वय २० रा. कोंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याचे दयानंद महाविद्यालयात १२ वीपर्यंत शिक्षण झाले होते. तो गेल्या काही सिवसांपासून शांतच होता. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी असलेल्या वडिलांनी माझे काम तीन महिने बंद आहे, मला पगार नाही, तुला पैसे कुठून देऊ असे त्याला खडसावले. त्यानंतर ते एसटीचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी गेले. अमर हा देखील घराबाहेर गेला, त्यानंतर तो दुपारी घरी आला. घरात आई व त्याची चुलती जेवण करत होते. आईने त्याला जेवण्यासाठी आग्रह केला, मात्र तो नको म्हणत थोडा आराम करतो म्हणून स्वतःच्या खोलीत गेला. बराच वेळ झाले तरी तो बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्या खोलीजवळ गेल्या. आवाज देऊ लागल्या, मात्र काहीच आवाज येत नव्हता. आतून कडी लावण्यात आली होती. मोठ्या भावानेही आवाज दिला, शेवटी खिडकीतून पाहिले असता अमर साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला व अमरला खाली उतरवले. त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर विभागात २७ ऑक्टोबरपासून एसटी महामंडळाचे विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी संप सुरु आहे. या संपात सहभागी असलेले तुकाराम माळी हे २००० मध्ये एसटी महामंडाळात चालक म्हणून रुजू झाले होते. अल्प वेतनावर ते कार्यरत होते. त्यांना दोन मुले, पत्नी, आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!