Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : ऐकावे ते नवलच !! बिनधास्त चालवले जात होते ‘गे सेक्स रॅकेट ‘, पोलीस कारवाईत तिघे जण अखेर गजाआड

Spread the love

मुंबई : आजकालच्या जमान्यात कोण काय शक्कल लढवून पैसे कमावेल याचा नेमका अंदाज बांधता येत नाही. आपण स्पा किंवा ब्युटीपार्लरच्या आडून चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांनी उद्धवस्त केल्याचे ऐकले असेल. उच्चभ्रू वस्तीत चालविण्यात येणाऱ्या कुंटणखान्याच्याही बातम्या आपण वाचल्या किंवा पाहिल्या असतील परंतु मुबंईच्या मालवणीत घडलेले ‘गे सेक्स रॅकेट ‘ उघडकीस आणण्याची कामगिरी मालवणी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात हे ‘ गे सेक्स रॅकेट ‘ चालवणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींची टोळी प्रचंड भयानक होती. एका ऑनलाईन डेटिंग गे अ‍ॅपद्वारे या टोळीकडून गे  सेक्स रॅकेट चालवण्यात येत होते. हे  आरोपी ‘ग्रिंडर ‘ या मोबाईल अ‍ॅपद्वारे समलिंगी समाजाच्या तरुणांशी संपर्क साधायचे. त्यानंतर आरोपी तरुणांना त्यांच्या मालवणी परिसरातील कार्यालयात किंवा घरी सशक्त तरुण पुरविण्याची हमी द्यायचे. अखेर अशा माध्यमातून गे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इरफान फुरकान खान (वय 26), अहमद फारुखी शेख (वय 24), इम्रान शफीख शेख (वय 24) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. मुंबईच्या  ‘मिड डे’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले कि ,  हे प्रकरण उघड होण्यामागेदेखील एक घटना कारणीभूत आहे. आरोपींनी गे डेटिंग अ‍ॅपद्वारे अकाउंटट म्हणून एका कंपनीत काम करणाऱ्या २३ वर्षीय  संबंधित ‘गे डेटिंग अ‍ॅप’वर आपला इंटरेस्ट दाखवला होता. हा तरुण त्यांच्या जाळयात अडकताच आरोपींनी या तरुणांला  एका तासाचे एक  हजार रुपये मोजावे लागतील, असे  सांगितले  होते. त्यानुसारझालेल्या चर्चेनुनंतर पीडित तरुण हा आरोपींच्या मालवणी येथील कार्यालयात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मालवणी येथील एका मैदानाजवळ पोहोचला होता. ठरल्यानुसार आरोपी इरफान खान हा पीडित तरुणासोबत शरीरसंबंध ठेवणार होता. पण खान हा कामात व्यस्त होता. त्यामुळे त्याने त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याला सांगितले तेंव्हा तोही व्यस्त असल्याने  खानने त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांना याबाबत सांगितले.

या दरम्यान, पीडित तरुण आरोपींच्या ऑफिसात दाखल झालेला होता. तो तिथे आपल्या सेक्स पार्टनरची वाट पाहत होता. थोड्यावेळाने चारजण तिथे आले. त्या सर्वांनी एकत्र त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा हट्ट केला. पण तरुणाने त्यांची ती मागणी नाकारली. त्यानंतर या चारही आरोपींनी रागाच्या भरात पीडित तरुणाला प्रचंड मारहाण केली. आरोपींनी पीडित तरुणाकडून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच त्याचं पाकिट आणि इतर मौल्यवान वस्तूही हिसकावून घेतल्या. आरोपींनी तरुणाला दमदाटी करुन त्याचा डेबिट कार्डचा पिनही मिळवला . दरम्यान आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणाच्या अंगावरील कपडे काढून त्याचा न्यूड व्हिडीओही  बनवला. तसेच तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. तरुणाने आपण पैसे घेऊन येत असल्याचा बहाणा करत तिथून कशीतरी सुटका करुन घेतली. त्यानंतर पडित तरुणाने आपल्या कुटुंबियांना फोन करुन आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडित तरुण हा बोरीवलीला राहतो. त्याने जेव्हा आपल्या कुटुंबियांना फोन केला तेव्हा आरोपी हे त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर उभे राहून रोडच्या दिशेला असलेल्या पीडित तरुणाकडे बघत होते. थोड्यावेळाने पीडित तरुणाचे नातेवाईक त्याच्याजवळ आले तेव्हा आरोपींनी घटनास्थळावरुन धूम ठोकली. या प्रकरणी पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सिनिअर पोलीस इन्सपेक्टर शेखर भालेराव आणि हसन मुलानी यांच्या पथकाने या प्रकरणी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!