Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : शहर पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक करत २० मोटरसायकल केल्या जप्त…

Spread the love

औरंगाबाद – गेल्या तीन दिवसात तीन चोरट्यांना५लाख ४५हजारांच्या २०मोटरसायकलसहित शहर पोलिसांनी अटक केली.शहरातील जवाहरकाॅलनी,मुकुंदवाडी,पुंडलिकनगर ,सिडको भागातून गेल्या वर्षभरात मोटरसायकल चोरीस गेल्या होत्या. चंदु विठ्ठल मगरे,शेख सुफीयान शेख रियाज(२८) व साजकुमार नारायण पुरी (४१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील कारवाई पुंडलिकनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, अविनाश आघाव आणि संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरसायकल चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या. यावेळी शहर पोलिसांनी आवाहन केले की, फिर्यादींनी पुडलिकनगर ,जवाहरनगर आणि गुन्हेशाखेशी संपर्क करुन वाहन धारकांनी आपली वाहने ओळखावी. एपीआय शेषराव खटाने, पीएसआय संतोष राऊत,व कल्याण शेळके यांनी वरील कारवाई पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!