Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : आयएनएस रणवीर या नौदलाच्या जहाजावर स्फोट , ३ जवान शाहिद , १७ जखमी

Spread the love

मुंबई :  नौदलाचे  मोठे जहाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएनएस रणवीर या जहाजात अचानक झालेल्या स्फोटात तीन नौसैनिक शाहिद झाले असल्याचे वृत्त आहे. आयएनएस रणवीरच्या इंटर्नल कंपार्टमेंटमध्ये हि घटना घडली असली तरी या घटनेत अधिक नुकसान झाले नसल्याचे नौदलाने म्हटले आहे . दरम्यान या अपघातात १७ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयएनएस रणवीर हे जहाज भारतीय नौदलातील राजपूत श्रेणीच्या ५ सर्वात शक्तीमान  जहाजांपैकी चौथ्या क्रमांकाचे जहाज आहे . या जहाजाला १९८६ मध्ये नौदलात समाविष्ट करण्यात आले  होते.


या घटनेची माहिती मिळताच  जहाज चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्याला सुरुवात केल्यानंतर  त्यांना काही काळाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले परंतु  तोपर्यंत तीन जवानांचा मृत्यू झालेला होता. आयएनएस रणवीर हे जहाज नोव्हेंबर २०२१ पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते  आणि लवकरच बेस पोर्टवर परतणार होते . पण या दरम्यान घडलेल्या घटनेने नौदलात खळबळ उडाली आहे.

दरम्यान भारतीय नौदलाने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर २०१७ साली आयएनएस रणवीर जहाजाच्या वैशिष्ट्याविषयी माहिती जाहीर केली होती. रणवीर श्रेणीतील हे पहिले  विध्वंसंक जहाज असल्याचं नौदलाकडून सांगण्यात आले होते . हे जहाज २१ एप्रिल १९८६ रोजी भारतीय नौदलात दाखल झाले  होते . या जहाजाचे विस्थापन५ हजार टन, लांबी १४६ मीटर, बीम १५.८ मीटर आहे. त्यामुळे ते जास्त वेगात सक्षम मानले जाते. या जहाजात ३० अधिकारी आणि ३१० खलाशांचा ताफा असतो. तसेच ते शस्त्रे आणि सेन्सर्सच्या श्रेणीने सुसज्ज असतात. यामध्ये जमिनीवरुन जमिनीवर तसेच जिमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, तोफांचा समावेश असतो, असे या माहितीत म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!