Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : रेकॉर्डवरच्या गुन्हेगारचा पूर्व वैमनस्यांतून खून , चौघे जण अटकेत

Spread the love

औरंगाबाद- रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराचा चाकूने वार करून नऊ जणांनी पहाटेच्या सुमारास  मिसारवाडीपरिसरात खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिन्सी पोलीस आणि गुन्हे शाखेने चार जणांना ताब्यात घेत सिडको पोलिसांच्या हवाली केले. सिडको पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांनी खुनाची  कबुलीही  दिली असल्याची माहिती  पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. हसन साजिद पटेल (२५) असे मयताचे नाव आहे. तर मुसा शेख ,आकेब उर्फ गोल्डन युनूस रियाज उर्फ डॉन व राहील अन्सारी एक अशी अटक आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मयत आणि आरोपी सर्व रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. मयतावर दहा महिन्यांपूर्वी सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल आहे. हर्सूल चा हसन पटेल व तालेब चाऊस यांच्यातील गॅंगवार पुन्हा उफाळून वर आला अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. मयताचा भाऊ जावेद साजिद पटेल (२९) रा. जाधववाडी याने फिर्यादीत नमूद केले आहे की, शनिवारी (१५) रोजी रात्री ९ वा. मयत हसन हा मोटारसायकलवर घराबाहेर पडला त्याचा फोन बंद येत होता म्हणून मोठा भाऊ जावेद हा त्याला शोधण्यासाठी बाहेर पडला तर रात्री ११ वा. मिसारवाडीतील मेंन रोडवर मयत हसन सिगारेट पीत होता. त्यावेळेस जावेदने त्याला घरी जाण्यास सांगितले. तेवढ्यात त्याठिकाणी आरोपी तालेब सुलतान चाऊस,सुलतान चाऊस, नासेर चाऊस,आली सुलतान चाऊस सर्व रा. मिसारवाडी नासेर अब्दुल वाहेद पटेल रा. हर्सूल राहील अन्सारी, मुसा शेख, रियाज उर्फ डॉन सर्व रा. कटकट गेट , आकिब गोल्डन युनूस कुरेशी रा. सिल्लेखाना व अन्य तीन चार जण धावत हसन कडे आले तेंव्हा तालेब सुलतान चाऊस ने मयत ह्सनवर सपासप चाकूने वार करून गंभीर जखमी केले व इतरांनी लाथाबुक्क्याने मारले या मारहाणीत हसन चा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पीएसआय कल्याण शेळके यांनी आकिब उर्फ गोल्डन युनूस ला पहाटे १ वा पकडले  तर जिन्सी  पोलिसा ठाण्याचे पीएसआय गोकुळ टाकुन यांनी राहील अन्सारी, मो. रियाज याला पकडले, तर पीएसआय दत्ता शेळके यांनी मुसा शेख याला पकडताच संशयितांनी गुन्ह्याची  कबुली दिली. जिन्सी पोलिसठाण्याचे एएसआय संपत राठोड, एनपीसी  सुनील जाधव, नंदूसिंग परदेशी, नंदलाल चव्हाण यांचाही कारवाईत समावेश होता. वरील कारवाई पोलीस निरीक्षक आविनाश आघाव, व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!