Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : नाही नाही म्हणत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले हे उत्तर !!

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे, अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.


प्रारंभी अजित पवार यांनी देवेन्द्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल किंवा देशाच्या राजकारणात आमची भगिनी सुप्रिया सुळे हे लोक उत्तर देतील असे सांगत शरद पवार यांची उंची काय आहे, त्यांचं देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोललं पाहिजे, तारतम्य पाळले पाहिजे,” असे मत व्यक्त केले.

अजित पवार म्हणाले,महाराष्ट्रापुरते जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचे उत्तर सडेतोडपणे देईल. देशाच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलत असतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल. राजकीय जीवनात मला ३० वर्षे झाली. मला बारामतीकरांनी जरी खासदार म्हणून निवडून दिले होते , पण ६ महिन्यात मी परत आलो. पुढे शरद पवार यांना दिल्लीला जावे लागले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नाही. मी महाराष्ट्रात समाधानी आहे. माझे माझे काम चाललेले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!