Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LoksabhaNewsUpdate : ठरलं !! ३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

Spread the love

नवी दिल्ली : संसदेचे या वर्षीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच संसदेतील ७०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जानेवारीपर्यंत सुमारे ७१८ कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये २०४ कर्मचारी हे राज्यसभा सचिवालयाचे आहेत.


लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा केली आहे. लोकसभेचे आठवे सत्र हे ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून आठ एप्रिलला हे अधिवेशन संपण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ३१ जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. तर केंद्रीय अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारी रोजी मांडले जाणार आहे.

देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट असताना संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यावेळी पहिल्या सत्रात राज्यसभेचे कामकाज तर दुसऱ्या सत्रात लोकसभेचे कामकाजाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मात्र बजेट सत्र, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन हे ठरलेल्या वेळेनुसारच पार पडले. मात्र या काळात कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन देखील करण्यात आले होते. त्याच धर्तीवर या अधिवेशनाची तयारी करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!