Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आले समोर

Spread the love

नवी दिल्ली : भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेला भीषण अपघात नेमका कसा झाला ? या सर्वांच्या मृत्यूचं नेमके कारण काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे.या अपघातात जनरल रावत यांच्यासह १४ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताने संपूर्ण देश हळहळला होता.


दरम्यान दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या अपघातावरील प्राथमिक अहवाल न्यायालयात (The Tri-Services Court) सादर करण्यात आला आहे. या चौकशीत तपास पथकाने हेलिकॉप्टरचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचाही अभ्यास केला. याशिवाय सर्व साक्षीदारांचे जबाबही घेण्यात आले. यातून या अपघाचे कारण काय असू शकते याचा अंदाज घेण्यात आला. चौकशीत अपघातामागे मेकॅनिकल फेल्युअर म्हणजेच यांत्रिक बिघाड, घातपात किंवा दुर्लक्ष या सर्व शक्यता फेटाळण्यात आल्या आहेत.

नेमकं कारण काय ?

न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या या अहवालानुसार  या भागातील अचानक बदललेले  हवामान आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा ढगांमध्ये झालेला प्रवेश हे या हेलिकॉप्टरच्या अपघाताला कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोर्ट ऑफ इंक्वायरीने चौकशी अहवालातील माहितीच्या आधारे काही शिफारसी देखील केल्या आहेत.

तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह सैन्याचे १२ अधिकारी प्रवास करीत होते. मात्र, या अपघातात रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातून एक अधिकारी वाचले होते मात्र, ते गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!