Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharshtraUpdate : कोरोनाबाधितांचा राज्यातील आलेख वाढताच…अशी आहे आजची स्थिती !!

Spread the love

मुंबई : राज्यात गेल्या 24 तासात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43, 211 इतकी झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 33, 356 रुग्ण रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान राज्यात आज 238 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत 1605 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 859 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे. सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,15,64,070 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

दरम्यान मुंबईतून मात्र दिलासादायक बातमी असून मुंबईत गेल्या 24 तासांत 11 हजार 318 नवे कोरोनाबाधित सापडले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. पण रुग्णसंख्या 10 हजारांहून अधिक असल्याने धोका कायम आहे. ज्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणे महत्त्वाचे झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गुरुवारी 22 हजार 73 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट एका टक्क्याने वाढून 89 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच मागील 24 तासांत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 435 झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!