Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : परिचारिकेचे लैंगिक शोषण करून गर्भपात करणारा डॉक्टर अटकेत

Spread the love

दामिनी पथकाच्या मदतीनंतर डॉक्टरसह चौघांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : येथील गारखेडा परिसरातील एका प्रसिद्ध हाॅस्पिटलमध्ये काम करणार्‍या डाॅक्टरला मुकुंदवाडी पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून प्रसाद संजय देशमुख (२४) असे अटक करण्यात आलेल्या डाॅक्टरचे नाव आहे.तर डाॅक्टरचे अन्य तीन मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२१ पासून आरोपी डाॅक्टरने त्याच रुग्णालयात  परिचारिका म्हणून कार्यरत असणाऱ्या पिडीतेचे लैंगिक शोषण केले आणि तिचा गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. त्यामुळे निराश झालेली पिडीता सिडको एन १ परिसरात असलेल्या पोलिस चौकी जवळ येत रडत बसली होती. तिला रडताना पाहून एका सुरक्षा रक्षकाने  दामिनी पथकाला फोन केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुवर्ण उमाप, हवालदार लता  जाधव, निर्मला निंभोरे , मनीषा बनसोडे, गिरीजा आंधळे यांच्या पथकाने पिडीतेला विश्वासात घेऊन तिची चौकशी करून तिला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आणून आरोपी विरुध्द तक्रार देण्यासाठी मदत केली.

पीडितेच्या तक्रारींनंनतर मुख्य आरोपी डॉ. प्रसाद देशमुखसह, हॉटेल चालक दीपक पाटील, मेडिकल दुकानदार संजय शिंदे आणि इतर एक अशा चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार डॉ. प्रसादने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यातून तिला दिवस जाताच त्याने तिचा गर्भपात केला तसेच अशा स्थितीतही त्याने पुन्हा तिच्यावर जबरदस्ती केली . तसेच त्याचा मावसभाऊ दीप पाटील आणि त्याच्या मित्रांनीही तिचा विनयभंग केला. दरम्यान या प्रकरणानंतर ती निराश भावनेने रडत बसली होती. दरम्यान दामिनी पथकाच्या मदतीस तिने आरोपींविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. या परणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बागूल करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!