Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : रेकॉर्डवरील दोन दरोडेखोरांना गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन केले सोलापूर पोलिसांच्या हवाली…

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात एन्जॉय करणाऱ्या रेकॉर्डवरील बुलढाण्यातील दोन वॉन्टेड दरोडेखोरांना गुन्हेशाखा आणि जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेऊन सोलापूर पोलिसांच्या हवाली केले. शहर आणि जिल्ह्यात दरोडे घालणारे हे दोन दरोडेखोर शहरात गेल्या एक महिन्यांपासून किरायाने राहात होते. दरम्यान दरोडेखोरांच्या टोळीतील या दोघांना गुन्हेशाखा आणि जिन्सी पोलिसांनी रविवारी दु.१ वा.पकडून सोलापूर पोलिसांच्या हवाली केले. आकाश नायल भोसले (२४) आणि कन्हेया नायल भोसले (२७) रा.सिंदखेडराजा जि.बुलढाणा अशीअटक दरोडेखोरांची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हे दोघे सख्खे भाऊ असून ते बुलढाण्यातील दरोडेखोरांच्या टोळीतील सदस्य आहेत.गेल्या महिनाभरात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वरील टोळीने तीन दरोडे घालून दहशत पसरवली होती.सोलापूर पोलिसांनी आरोपींना जंग जंग पछाडले पण यांचा थांग पत्ता लागत नव्हता. दरम्यान गुन्हेशाखेचे पीएसआय दत्ता शेळके यांना खबर्‍याने या दोघांच्याबाबत माहिती दिली कि , गेल्या एक महिन्यापासून कैलासनगरातील गल्ली नंबर ५ मध्ये दोघे इसम मीरायाने असून ते नेहमी हात मारायच्या गोष्टी करतात. त्यांच्या बोली भाषेवरुन ते विदर्भातले वाटतात,हि माहिती मिळाल्यानंतर गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांची परवानगी घेऊन शेळके यांनी सोलापूर पोलिसांशी संपर्क साधला.

दरम्यान गुन्हे शाखेचे दत्त शेळके यांनी गेल्या महिन्याभरात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या दरोड्यांमधील संशयित आरोपींची नावे आणि मोबाईल नंबर घेतले. त्यानुसार त्यांचे लोकेशन चेक केले असता ते औरंगाबाद, कैलासनगर दाखवत होते. त्यानुसार गुन्हे शाखेने सोलापूर पोलिसांना रविवारी दुपार पर्यंत औरंगाबादेत बोलावले व जिन्सी पोलिसांच्या मदतीने रविवारी दुपारी १२ वा. कैलासनगरातील संशयितराहात असलेल्या ठिकाणी छापा मारला तेंव्हा हे दोन्हीही आरोपी दारु पित बसले होते. पोलिसांना पहाताच ते भानावर येत नाहीत तोच सोलापूर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. गेल्या महिन्यात बसणेही तालुक्या तीन दरोडे टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या कारवाईनंतर या दोन्हीही आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर शहर पोलिसांच्या हवाली केले. या कारवाईत पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, दिपक गिर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, जिनसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पीएसआय दत्ता शेळके पोलिस हेडकाँन्स्टेबल नंदलाल चव्हाण, किरण गावंडे, ओमप्रकाश बनकर, संपत राठोड, सुनील जाधव , किरण गावंडे , संजयसिंह राजपूत, नवनाथ खांडेकर यांनी सहभाग घेतला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!