Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMumbaiUpdate : मुंबईतील निर्बंधाबाबत चहल यांचा दिलासादायक खुलासा

Spread the love

मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईतली सध्याची परिस्थिती पाहाता मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, असे स्पष्ट केल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबतची पालिका प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.


इक्बालसिंग चहल यांनी म्हटले आहे कि , मुंबईत काल (गुरुवारी) २० हजारच्या वर केसेस झाल्या. त्यापैकी फक्त ११० लोक ऑक्सिजन बेडवर गेले. ११८० लोक रुग्णालयात दाखल झाले. ३५ हजार पैकी फक्त ५९९९ बेड भरले आहेत. ८४ टक्के बेड रिकामे आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर नगण्य आहे, बेड रिकामे आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही लॉकडाऊनची गरज नाही.

आता निकष बदलण्याची गरज

दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णवाढीबाबत ३० डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी आमची आढावा बैठक घेतली. ओमायक्रॉन, तिसरी लाट याबाबत पुढील उपाययोजनांवर चर्चा झाली. काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा विचार करण्याची भूमिका मांडली. पण मी सांगितलं की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे मापदंड पॉझिटिव्हिटी होते. पण आत्ता मुंबईतले १८६ रुग्णालय, ३५ हजार बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचे निकष बदलून पॉझिटिव्हीटी ऐवजी पहिला निकष म्हणजे रुग्णालयात किती बेड रिकामे आहेत आणि दुसरा निकष म्हणजे ऑक्सिजनचा वापर किती होतोय असे करावेत, असे सांगितल्याचेही ते म्हणाले.

आता आकड्यांवर लॉकडाऊन नाही

पुढे बोलताना चाहूल म्हणाले कि , आता रुग्णांच्या आकड्याला महत्त्व राहिलेले नाही. हॉस्पिटलची, ऑक्सिजनच्या वापराची, ऑक्सिजन बेडची स्थिती काय आहे, हे महत्त्वाचं आहे. रुग्णसंख्या कमी असतानाही ऑक्सिजनचा किंवा आयसीयूचा वापर वाढला, तर आपण निर्बंधांचा विचार करू. रुग्णसंख्या कमी-जास्त होत असेल, तर त्याचा फरक पडत नाही. आज २० हजार ४०० रुग्णसंख्या झाली आहे. काल ६४ हजार चाचण्या केल्या होत्या, आज ७२ हजार चाचण्या केल्या आहेत. पण आता आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही.

गेल्या महिन्यात २१ डिसेंबरला आपल्याकडे पॉझिटिव्हिटी रेट वाढायला सुरूवात झाली. १६ दिवसांत मृत्यूचा आकडा १९ आहे. म्हणजे सरासरी दिवसाला एक मृत्यू आहे. आपल्याकडे रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर गेली आहे, पण मृत्यू सरासरी एकच आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार अतिरिक्त निर्बंधांची गरज नाही. मुंबई लोकलमधून ६० लाख लोक प्रवास करत आहेत. सगळे दुहेरी लस घेतलेले आहेत. त्यामुळे तिथे निर्बंध घालण्याची गरज नाही. पुढे जे काही होईल, त्यावर आमचे बारीक लक्ष आहे. सध्या अतिरिक्त निर्बंधांची गरज नाही असे सर्व यंत्रणांनी स्पष्ट केले असल्याचेही त्यांनी येवेळी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!