Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : मोठी बातमी : राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील वर्ग बंद

Spread the love

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असल्याने राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी.  मात्र या काळात ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू राहणार आहेत. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच  होणार आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत, असे  सामंत यांनी म्हटले आहे.


सामंत म्हणाले कि , १३ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सरकारने महाविद्यालये ऑफलाइन सुरू करण्याच निर्णय घेतला. दोन लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत.

महाविद्यालये, विद्यापीठांना दिलेल्या सूचना अशा आहेत…

१५ फेब्रुवारीपर्यंत सर्व कॉलेजे बंद राहतील.
> सर्व अकृषी विद्यापीठांसोबत खासगी विद्यापीठ, महाविद्यालयांनाही हा निर्णय लागू राहील.
> या कालावधीत शिक्षण ऑनलाइन होईल.
>  काही कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाही तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुलगुरुंनी त्यांची सोय करावी.
– गोंडवाना, नांदेड, जळगाव विद्यापीठांत नेट जोडणीची अडचण असल्याने स्थानिक परिस्थिती पाहून ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात.
> कॉलेज, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन सुरू कराव्यात.

सर्व विद्यापीठे वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील.

मात्र परदेशी विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेऊन वसतिगृहात राहू शकणार आहेत.

विद्यापीठे तसेच कॉलेज विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसतील तर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी.

> पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचेही लसीकरण करावे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कॉलेजमध्ये, विद्यापीठांमध्ये ५० टक्के उपस्थिती असेल. ही उपस्थिती चक्राकार पद्धतीने राबवणे अनिवार्य असेल.

मुंबईतील आयआयटीमध्येही निर्बंध

मुंबईतील आयआयटीलाही कोरोनाचा फटका बसला असून या  संस्थेत मंगळवारपर्यंत ३० कोरोनाबाधित झालेले असताना आज या रुग्णांची संख्या १०० वर गेली आहे. यापैकी ५० टक्के विद्यार्थी आहेत. त्यामुळे संस्थेने लेक्चर्स आणि प्रयोगशाळेतील सर्व काम ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दोन आठवड्यांसाठी अंमलात जाणार आणि त्यानंतर पुन्हा ताज्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. गेले अनेक दिवस संस्थेने विद्यार्थ्यांना आणि अन्य कॅम्पस रहिवाशांसाठी ई-मेलद्वारे मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेने जारी केलेली नवी मार्गदर्शक तत्वे होस्टेलला देखील लागू आहेत.  संस्थेने कॅम्पसबाहेर रहदारीदेखील नियंत्रित केली आहे.

दरम्यान  आयआयटी खरगपूर कॅम्पसमध्येही  ४० विद्यार्थी आणि रिसर्चरसह ६० जण करोना पॉझिटीव्ह आढळले असून या सर्व लोकांना होमआयसोलेशनमध्ये किंवा संस्थेच्या वसतिगृहात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आयआयटी खरगपूरचे रजिस्ट्रार तमलनाथ यांनी दिली. येथील वर्गही पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले असून ऑनलाईन वर्ग सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!