Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

OmicronInformationUpdate : अशी आहे महाराष्ट्र आणि देशातील ओमायक्रॉनची स्थिती

Spread the love

नवीदिल्ली : एकीकडे देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असून दुसरीकडे ओमायक्रॉनचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. केंद्राच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांचा आकडा सध्या २५ हजाराहून अधिक झाला आहे . तर देशभरातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या १५२५ झाली आहे.  गेल्या २४ तासांत २७ हजार ५५३ कोरोना रुग्ण आढळले असून २८४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देशातील  २३ राज्यांमध्ये आत्तापर्यंत वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन प्रकाराच्या रुग्णांची नोंद केली गेली आहे. ओमायक्रॉन बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात ४६० रुग्ण असून पाठोपाठ दिल्लीमध्ये ३५१ रुग्ण आहेत. गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत २१ नवीन ओमायक्रॉन बाधित आढळले असून एकूण प्रकरणं १३६वर पोहोचली आहेत. तर, तामिळनाडू चौथ्या क्रमांकावर असून इथे ११७ रुग्ण आणि केरळमध्ये १०९ रुग्ण आहेत.

दरम्यान देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या सध्या ३,४८,८९,१३२ आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या पॉझिटीव्हीटी रेट २.५५ टक्के आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!