Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : … तर गांधींच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य मिळण्यास आणखी वेळ लागला असता : भगतसिंग कोश्यारी

Spread the love

पुणे : बहराच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचं काम गांधीजींना पूरक ठरले . जर क्रांतिकारकांनी सशस्त्र बंड केले नसते , तर गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाला आणखी वेळ लागला असता. एकीकडे बापूंचा सत्याग्रह आणि दुसरीकडे क्रांतिकारक शस्त्र घेऊन उभे राहिल्याने इंग्रजांनी भारत सोडला,त्यामुळे भारतात आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे मिळाल्याचे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीकेले आहे.

पुण्यातील चिंचवडगावात पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथे बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले कि , इंग्रज क्रांतिकारकांना घाबरले. क्रांतिकारकांचे बंड पाहून पुढे हे बंड वाढतील असे इंग्रजांना वाटले . त्यामुळेच त्यांनी बंड वाढण्याआधीच महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहानंतर भारत सोडला, असे नमूद करून ते पुढे म्हणाले कि , आपल्याला आज जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे मिळालं आहे. क्रांतिकारकांना इंग्रज घाबरले. क्रांतीकारकांचे बंड पाहून ही तर सुरुवात आहे, पुढे हा बंड वाढेल असं इंग्रजांना वाटलं. त्यामुळेच बंड होण्याआधी इंग्रज महात्मा गांधी यांच्या सत्यगृहानंतर भारत सोडला. महात्मा गांधी यांचा खूप सन्मान आहे आणि तो केला पाहिजे. त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. परंतु क्रांतिकारकांनी बंड केले नसते , तर गांधींच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य मिळण्यास आणखी वेळ लागला असता”

दरम्यान त्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना कोश्यारी म्हणाले कि , “सध्या कामाला महत्व देण्याची आवश्यकता आहे, नोकरीला नाही. कशाप्रकारे देशाला पुढे नेऊ शकतो त्या दिशेने काम करा. येथील मुलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न गिरिष प्रभुणे करत आहेत. तसेच आपण सर्व जण सरकारच्या मदतीशिवाय आत्मनिर्भर होऊ शकतो, असा प्रयत्न कराल.पुनरुत्थान गुरुकुलममध्ये काही वस्तू बनवल्या जातात. फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेल्या वस्तू चकाकणाऱ्या दिसतील. पण, येथील गुरुकुलममध्ये बनवलेल्या वस्तू नैसर्गिक आहेत. ते घेऊन गेलात, तर प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाचे रक्षण होईल. यावर आपण विचार करायला हवा. तेव्हा आपण यात सहभाग घेतला असं समजू.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटिझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २ दिवसीय प्राचीन भारतीय संस्कृती व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना भगतसिंह कोश्यारी यांनी हे आवाहन केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!