Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to
Spread the love

Mahanayak Online – केतन कोलते


कलाकार मानधन योजना अर्ज Download

लॉकडाऊनच्या काळात सांस्कृतिकी क्षेत्राला मोठा फटका बसला, यामुळे अनेक लोककलावंतांची आर्थिक परिस्थिती डगमगली आणि त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले. हि परिस्थिती लक्षात घेऊन सांस्कृतिक संचालनालयाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ५६ हजार कलावंतांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

जेव्हा एखाद्या कलाकाराला अपघाती शारीरिक अपंगत्वाच्या वेळी आर्थिक मदतीची आवश्यकता असते तर त्यासाठी ‘कलाकार मानधन योजना’ राबविण्याचा हेतू आहे. कोरोनाकाळात आर्थिक स्थिती ढासळल्याने सांस्कृतिक संचालनालयाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. Kalakar Mandhan Yojana Maharashtra 2021 कलाकार मानधन योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे, लाभाचे स्वरूप आणि संपर्क साधण्याचे ठिकाण याची संपूर्ण माहीती अशा प्रकारे आहे.

  1. वृद्ध साहित्यिक/कलावंत यांनी जिल्हास्तरावर समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अथवा तालुका स्तवरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे या योजनेंगत मानधन मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

  2. प्राप्त अर्जाची जिल्हा परिषदेमार्फत खालील निकषांच्या आधारे छाननी करण्यात येईल.

  3. साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे.

  4. कला आणि वाङ्मय क्षेत्रात ज्यांनी किमान 15 ते 20 वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे.

  5. ज्या स्त्री/पुरूष कलाकाराचे व साहित्यिकांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे.

  6. जे साहित्यिक व कलावंत अर्धांगवायू, क्षय, कर्करोग, कुष्टरोग या रोगांनी आजारी असतील तसेच ज्यांना 40% पेक्षा जास्त शारिरिक व्यंग असेल किंवा अपघाताने 40% पेक्षा जास्त अपंगत्व आले असेल व त्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय करू शकत नाही, असे साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात येईल.

  7. वयाने वडील असणाऱ्या व विधवा /परितक्त्या वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.

  8. ज्या साहित्यिक व कलावंतांचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न रू.48,000/- पेक्षा जास्त नाही.

  9. छाननीअंती योजनेच्या निकषानुसार पात्र ठरणारे अर्ज जिल्हास्तरीय निवड समितीच्या मान्यतेस्तव सादर करण्यात येतील.

  10. जिल्हास्तरीय निवड समिती पात्र अर्जातून प्रतिवर्षी इष्टांकाच्या मयदित 60 लाभार्थ्यांची मानधनासाठी निवड करू शकेल. निवड झालेल्या लाभार्थ्यांना तहह्यात मानधन अदा करण्यात येईल.

  11. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शासन निर्णय क्र. वृकमा 2013/प्र.क्र. 40/सां.का. 4 दिनांक 2282014 अन्वये सुधारित दराने

कलाकार मानधन योजना अर्ज Download

अ.क्र.

कलावंतांची वर्गवारी वर्गीकरण संख्या
मानधनाची रक्कम (रूपये )
प्रतिमाह वार्षिक
1) राष्ट्रीय कलावंत    अ वर्ग 448
2,100/- 25,200/-
2) राज्यस्तरीय कलावंत   ब वर्ग 820
1,800/- 21,600/-
3) स्थानिक कलावंत     क वर्ग 25882
1,500/- 18,000/-
एकूण- 27150

कलाकार मानधन योजना अर्ज Download

कलाकार मानधन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  1. साहित्य कलाक्षेत्रातील पुरावे (सन २०१० च्या आतील कलेचे पुरावे)
  2. उत्पन्नाचा दाखला
  3. वयाचा दाखला
  4. रेशनिंग कार्ड झेरॉक्स
  5. आधार कार्ड
  6. बँक पासबुक
  7. पति पत्नीचा फोटो जर पत्नी नसेल तर स्वःताचा फोटो
  8. शिफारस पत्र
  9. सरकारी लाभ मिळत नसल्याचे नोटिस 100/- रु.च्या स्टॅम्प पेपरवर लेखी.
  10. वयाची अट किमान 50 वर्षे
  11. सर्व कागदपत्रांच्या प्रत्येकी 3 छायांकित सत्यप्रत असावी.

मानधन

  • अ वर्ग-२,१०० रुपये प्रति महिना
  • ब वर्ग – १,८०० रुपये प्रति महिना
  • क वर्ग- १,२०० रुपये प्रति महिना

Mahanayak Online – Ketan Kolte

आपलं सरकार

Click to listen highlighted text!