Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

TrafficRulesUpdate : वाहतुकीचे नवे नियम सुरु झाले आहेत तुम्हाला माहित आहेत का ? होऊ शकतो जबर दंड आणि तुरुंगवासही … !!

Spread the love

जगदीश कस्तुरे


औरंगाबाद – वाहतूक नियम मोडल्यास सरळ गुन्हा दाखल करुन न्यायालयाकडे पाठवल्या जाणार्‍या प्रकरणामधे तब्बल ११ पटीने वाढ झाली आहे.त्यासाठी वाहतूक विभागाच्या अधिकार्‍यांची मोटरवाहन न्यायालयाने आज एक बैठक बोलावली होती. या नव्या नियमाचे पालन न केल्यास तुम्हाला दंडाबरोबर कारावासाची शिक्षाही होऊ शकते. 

वाहतूक नियमात मोठे बदल झाल्याचे आदेश पोलिसआयुक्तालयाकडून जारी झाल्यानंतर वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील ? सर्व अधिकारी कर्मचारी यामधे निष्णात होण्यासाठी कशाप्रकारे त्यांनाप्रशिक्षण द्याव लागेल याचा प्राथमिक उहापोह आज मोटरवाहन न्यायालयाने शहरातील पाच वरिष्ठ वाहतूक निरीक्षकांसोबंत केला.

शहर, सिडको, वाळूज, आणि छावणी या विभागाचे वाहतूक प्रमुख नवीन नियमांचीअंमलबजावणी करण्यासाठी किती दिवसांच्या प्रशिक्षणाची वाहतूक कर्मचार्‍यांना गरंज आहे.याची चाचपणी करंत होते. पूर्वी फक्त ५ वाहतूक नियम असे ळोते की, त्यांचे उल्लंघन केल्यावर वाहतूक विभाग सरळ गुन्हा दाखल करुन वाहनधारकाला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देत होते.त्या नियमात आता वाढ झाली असून ५२ते ५३नवीन नियम असे तयार करण्यात आले आहेत की, त्यासाठी वाहन धारकाला न्यायालयाकडूनच न्याय मिळणार आहे.या विषयावर जवळपास तीन आठवडे ते १महिना प्रशिक्षण वाहतूक कर्मचार्‍यांना द्याव लागेल असा मुद्दा बैठकीत उपस्थित केला गेला. वाहतूक न्यायालयाकडूनही वरिष्ठ न्यायधिशांचे मार्गदर्शन घेण्यासाठी काही दिवस लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

वाहतूक विभागाकडून नव्यानियमांची अंमलबजावणी ११ डिसेंबर पासून सुरु केल्याचे आदेश जारी झाले आहेत. यामधे जबर दंड व तुरुंगवासाची शिक्षेचीही तरतूद आहे.त्यानुसार वाहनधारक नवीन नियमांना सामोरे जाण्यासाठी कसे अनुशासित होतात यासाठी आदेश जारी केल्याचे सुत्रांनी सांगितले.नवीन वाहतूक नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी नव्या वर्षात सुरु करण्यात येईल.
असे आहेत नवे नियम

वैध अनुज्ञापनपत्रा शिवाय १६वर्षेवयाखालील व्यक्तीने वाहन चालवलेले आढळल्यास ५हजार रु दंड
वाहन चालवणारी व्यक्ती मोबाईल वापरतांना आढळल्यास पूर्वी २००रु.दंड होताआता ४ हजार रु.झाला
ट्रिपलसीट वाहनधारक १हजार रु.दंड

एकूण २०१ नवे नियमांचा सराव वाहनधारकांना करावा लागेल

आपलं सरकार

Click to listen highlighted text!